पुणे- विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका सेव्हन लव्हज चौक ते मार्केट यार्ड अशा उड्डाण पुलासाठी एकही कोणाचेही घर पाडणार नाही अशी ग्वाही आज येथे महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी दिली . हा पूल उभारण्यासाठी कित्येक वर्षे प्रयत्न केले पण भाजपची सत्ता आल्यानंतरच हे साध्य झाले . भाजपच्या नेत्यांच्या मदतीनेच आपण आणि आपले नगरसेवक पुणे शहराचा कायापालट करतील अशी हमी हि यावेळी त्यांनी दिली .
सेव्हन लव्हज चौक (अप्सरा सिनेमागृह )ते मार्केट यार्ड(वखार महामंडळ) अशा नियोजित पुलाच्या कामाचा आज भूमिपूजन समारंभ पालकमंत्री गिरीश बापट ,राज्यमंत्री दिलीप कांबळे, आ. माधुरी मिसाळ,महापौर मुक्ता टिळक ,भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले ,स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, कविता भरत वैरागे, प्रवीण चोरबोले, अमोल बालवडकर ,राजाभाऊ कदम,गोपाळ चिंतल मानसी देशपांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
एक वर्षात काय केले ? असे प्रश्न विचारणाऱ्यांना यावेळी भिमाले यांनी आपल्या प्रास्ताविकातून नॉनस्टाॅप उत्तर दिले. शिवसृष्टी ,मेट्रो ,२४ तास पाणीपुरवठा ,आणि उड्डाणपूल असे कित्येक वर्षे रेंगाळत ठेवलेले प्रकल्प आम्ही १ वर्षात मार्गी लावलेत . स्मार्ट सिटी म्हणजे , बेरोजगारांना काम, बेघरांना घर ,आणि चांगले आरोग्य अशा मानसिकतेतून आपण नागरिकांनी टाकलेली मोठी जबाबदारी पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्षात भिमाले यांचे हे नॉनस्टाॅप भाषण पहा आणि ऐका….
उड्डाणपूलासाठी एकही घर पाडणार नाही …भिमालेंची ग्वाही
Date:

