संदीप खरे ,अभिनेत्री स्पृहा जोशी यांचा कोथरूडमध्ये सत्कार

Date:

पुणे :
‘संदीप खरे,स्पृहा जोशी  यांच्या काव्यात हळुवार भावनांचा स्पर्श असल्याने ते मनाला भावते . तरुणाईला संवेदनशील काव्य आणि कवितेची भुरळ पाडण्याचे काम यशस्वीपणे या दोघांनी केले आहे .त्यामुळे त्यांचा एकत्रित सत्कार करण्याचा योग कोथरुडकरांसाठी संस्मरणीय क्षण आहे ‘ अशा भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  नगरसेविका सौ . जयश्री मारणे यांनी शनिवारी व्यक्त केल्या .
निमित्त होते संदीप खरे,स्पृहा जोशी यांच्या सत्कार कार्यक्रमाचे .
कोथरूड मध्ये प्रभाग क्रमांक १० येथील नगरसेविका सौ .  जयश्री मारणे यांच्या हस्ते  कवी संदीप खरे ,अभिनेत्री स्पृहा जोशी यांचा  सत्कार करण्यात आला . ‘दमलेल्या बाबाची कहाणी ‘साठी प्रसिद्ध असलेल्या संदीप खरे यांनी यावेळी ‘संदीप खरे लाईव्ह ‘ हा कार्यक्रम स्पृहा जोशी यांच्या समवेत सादर केला आणि काव्यप्रेमींना रिझवले
.या कार्यक्रमात  चेतन कुलकर्णी,सई टेंभेकर,मिलिंद कुलकर्णी ,नितीन कानेटकर यांचा सहभाग होता .
 स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान(भुसारी कॉलोनी ) येथे हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी झाला . नगरसेविका जयश्री मारणे यांच्या प्रभागातील विकास कामांचा स्लाईड शो दाखविण्यात आला . ‘खेळाची मैदाने ,रस्ते ,कंटेनरमुक्त प्रभाग ,अंडर ग्राउंड वायरिंग अशा विविधांगी  कामांचा आढावा सौ .मारणे यांनी सादर केला .
‘संदीप खरे,स्पृहा जोशी  यांच्या काव्यात हळुवार भावनांचा स्पर्श असल्याने ते मनाला भावते . त्यामुळे त्यांचा एकत्रित सत्कार करण्याचा योग कोथरुडकरांसाठी संस्मरणीय क्षण आहे . तरुणाईला संवेदनशील काव्य आणि कवितेची भुरळ पाडण्याचे काम यशस्वीपणे या दोघांनी केले आहे . मराठी काव्य सर्वदूर पोहोचविण्यासाठी त्यांनी नव्या माध्यमातून अजून प्रयत्न करावेत ‘ असे उद्गार सौ . जयश्री मारणे यांनी यावेळी बोलताना काढले
मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले .मनसे प्रदेश उपाध्यक्ष एड . गणेश सातपुते , नगरसेवक एड . किशोर शिंदे ,नगरसेविका पुष्पा कनोजिया ,शहराध्यक्ष हेमंत संभूस ,अजय शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदींनी ओमानवरील हल्ल्याचा निषेध केला:8 आखाती देशांशी चर्चा, दुबई आणि अबू धाबीहून 2000+ भारतीय परतले

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी भारतीय समुदायाच्या लोकांच्या सुरक्षेबाबत...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन इराणशी चर्चा करणार:मध्य पूर्वेतील देशांवरील हल्ले रोखणे हे उद्दिष्ट

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन इराणशी चर्चा करणार आहेत. मंगळवारी...

२८ आणि २९ मार्चला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

चौथ्या विजेतेपदासाठी भाग्यश्री फंड उत्सुक ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक...

चंद्रकांतदादा पाटील यांची सीआयएसएफच्या जवानांसोबत होळी साजरी

जवानांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून मन समाधानाने भरुन आले-...