भारतीय फुटबॉल क्लबना एएफसी स्पर्धा खेळू देण्याची क्रीडा मंत्रालयाची  फिफा आणि एएफसीला  विनंती

Date:

मुंबई-युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने ‘खेळाडू प्रथम’ हा दृष्टीकोन ठेवत, आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना  (फिफा) आणि आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) यांच्याशी संपर्क साधला असून, श्री गोकुलम केरळ एफसी आणि एटीके मोहन बागान, या भारतीय फुटबॉल क्लबना (संघांना) नियोजित स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.

फिफा द्वारे एआयएफएफच्या निलंबनाची घोषणा होण्या पूर्वीच श्री गोकुलम केरळ एफसी, ऑगस्ट 23  रोजी इराण विरोधातला नियोजित सामना तसेच ऑगस्ट 26 रोजी यजमान देशाने दक्षिण उझबेकिस्तानमधील कुरेशी शहरात आयोजित केलेला सामना खेळण्यासाठी उझबेकिस्तान येथे पोहोचला आहे, तर एटीके मोहन बागान संघ सप्टेंबर 7 रोजी बहारीन येथे एएफसी कप 2022 (इंटर-झोन उपांत्य फेरी) सामना खेळणार आहे.  

फिफा आणि एएफसीला लिहिलेल्या ईमेल मध्ये क्रीडा मंत्रालयाने हे अधोरेखित केले आहे की, फिफाने एआयएफएफच्या निलंबनाची घोषणा केली तेव्हा श्री गोकुलम केरळ एफसी संघ आधीच उझबेकिस्तानमध्ये होता. त्यामुळे फिफा आणि एएफसीने युवा खेळाडूंचे हित लक्षात घेऊन संघाला एएफसी महिला क्लब चॅम्पियनशिप (पश्चिम क्षेत्र) स्पर्धेत खेळायची परवानगी देण्याबाबत विचार करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, या संघाला सर्व प्रकारची मदत मिळावी, यासाठी मंत्रालयाने उझबेकिस्तानमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे. मंत्रालय गोकुलम संघाच्या व्यवस्थापनाच्या देखील सतत संपर्कात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...