विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेल्या कोथरूड नवरात्र महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

Date:

पुणे-पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी पुण्यातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकसाठी कालबद्ध नियोजन करणार असल्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान आयोजित कोथरूड नवरात्र महोत्सवात चंद्रकांतदादांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हा मनोदय व्यक्त केला. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त सतीश कोंडाळकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, उमेश भेलके, महिला उत्सव प्रमुख माजी शिक्षण मंडल अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, सौ. श्वेताली भेलके, सौ.अक्षदा भेलके, सौ. कल्याणी खर्डेकर,प्रसिद्ध उद्योगपती संजीव अरोरा,ग्लोबल ग्रुप चे मनोज हिंगोरानी,मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, प्रवीण मसालेवाले चे संचालक विशाल चोरडिया, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, युवा उत्सव प्रमुख प्रतीक खर्डेकर, मोहित भेलके, आरपीआय चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंदार जोशी,व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी कोरोना नंतर मुक्त वातावरणात साजऱ्या होत असलेल्या नवरात्र उत्सवाच्या नागरिकांना शुभेच्छा देताना “आमच्या सरकारने निर्बंधमुक्त उत्सवाची घोषणा केली असली तरी स्वयंशिस्त महत्वाची असून दुसऱ्यांना त्रास होणार नाही अश्या पद्धतीने उत्सव साजरे करावेत असे सांगितलं. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासात असून दुर्गम भागातील विद्यार्थिनींना स्वेटर वाटप, दिव्यांगाना व्यवसायासाठी अर्थसहाय्य, गरजू विद्यार्थिनींची फी भरणे अश्या विविध उपक्रमांनी ते खऱ्या अर्थाने नवरात्र साजरी करत असल्याचे ही ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. मी कोरोना काळात क्रिएटिव्ह फाउंडेशन ने केलेले समाजकार्य जवळून बघितले असून असेच समजसेवेचे व्रत घेऊन सर्वांनी कार्य करावे असेही ते म्हणाले.
यावेळी चंद्रकांतदादांच्या हस्ते समाजकार्यासाठी सातत्याने मदत करणारे उद्योगपती संजीव अरोरा,ग्लोबल ग्रुप चे मनोज हिंगोरानी,मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, प्रवीण मसालेवाले चे संचालक विशाल चोरडिया यांचा तसेच लावणी कलावंत योगेश देशमुख, पूनम कुडाळकर, माधवी सातपुते तसेच सत्यजित धांडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
आजच्या ढगफुटी सदृश पावसाचा फटका पुणे शहराला बसला असताना आणि ऐन कार्यक्रमाच्या वेळी धुव्वाधार पाऊस असतानाही मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहिले ही क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या कार्याची पावती असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.नाटक आणि लावणी च्या कार्यक्रमाला प्रेक्षागृहाला हाऊसफुल चा बोर्ड लागणे दुर्मिळ असून आता भोंडला, मंगळागौरीचे खेळ, बालजत्रा व दांडियाच्या कार्यक्रमालाही कोथरूडकर उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असा विश्वास संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला. मंजुश्री खर्डेकर, श्वेताली भेलके व अक्षदा भेलके यांच्या हस्ते दिव्यांगांनी बनविलेल्या वस्तू देऊन चंद्रकांतदादा पाटील व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

​आयकर स्लॅब ‘जैसे थे’! नोकरदारांच्या अपेक्षांवर पाणी

कॅन्सरच्या 17 औषधांवर कस्टम ड्यूटी नाही, 3 आयुर्वेदिक एम्स,...

खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या साहित्य...

बोपोडी येथे अजित पवार यांना श्रद्धांजलीसाठी सर्वपक्षीय शोकसभा, भावनिक वातावरणात नागरिकांची मोठी उपस्थिती

ॲड. निलेश निकम यांच्या भावुक अनुभवाने उपस्थितांचे डोळे पाणावले पुणे- बोपोडी...