पुणे-यशवंतराव चव्हाण सेंटर जतन फाउंडेशन व खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन अॅड. अशोक अढूळकर, पुणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष काका चव्हाण, निवृत्ती येनपुरे, नितीन पाटील, अरुण पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

बराटे प्रॉपर्टीज व्हायोला सोसायटी गेट समोर, सिप्ला हॉस्पिटल रस्ता वारजे येथे सकाळी १० ते दुपारी ४ नागरिकांसाठी नेत्रतपासणी करण्यात आली. तज्ञ डॉक्टरांच्या वतीने नेत्र तपासणी करण्यात आली त्यासाठी अत्याधुनिक मशिनद्वारे नेत्रतपासणी करण्यात आली या तपासणी शिबाराला वारजे माळवाडी भागतील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला यामध्ये जवळजवळ एक हजारांहून अधिक महिला, पुरुष आणि जेष्ठ नागरिकांनी तपासणी करून घेतली यामध्ये 876 जणांना उत्तम प्रतीचे चष्मे मोफत देण्यात आले.

मानवी शरीरातील महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचे डोळे आहेत त्याची निगा चांगली राखली पाहिजे त्यासाठीच लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही या नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले आहे तसेच नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असून त्यांच्यासाठी नेहमीच आम्ही अशा कार्यक्रमांना प्राधान्य देत असल्याचे आयोजक बाबा धुमाळ आणि दीपाली धुमाळ यांनी सांगितले.यावेळी देवेन्द सूर्यवंशी, धनंजय म्हसे, धर्मराज हांडे महाराज, निलम डोलसकर, निवृत्ती येनपुरे शिवाजी भोईने, सुरेश जाधव, महादेव गायकवाड, प्रभावती कानगुडे, अरूण पाटील, मनिष धुमाळ, मोहित वेलाणी, आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


