स्पिनीने सचिनची पहिली कार पुन्हा तयार केली, बेयर्स ब्ल्यू ८००, नव्या सीझनचे कॅम्पेन “गो फार” साठी केली अनोखी किमया
नवी दिल्ली,:भारतातील फुल-स्टॅक युज्ड कार खरेदी आणि विक्रीचा प्लॅटफॉर्म स्पिनीने आपले नवे कॅम्पेन “गो फार” ची घोषणा केली आहे. यामध्ये स्पिनीचे ब्रँड अम्बॅसॅडर आणि धोरणात्मक गुंतवणूकदार सचिन तेंडुलकर सहभागी झाले आहेत. मोठी स्वप्ने पाहण्याची आणि गोष्टी प्रत्यक्षात साकार करण्याची भारताची तडफ दर्शवून तिचा सन्मान या फिल्म्स सीरिजमध्ये करण्यात आला आहे.
प्रेम, स्वप्न आणि ‘स्व’ यांच्या पूर्तीसाठी मर्यादांना ओलांडण्याची हिंमत आणि तडफ दाखवणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती या कॅम्पेनमध्ये दिसतात.सर्वोच्च कोटीचे यश मिळवलेल्या सचिन तेंडुलकर यांच्यासाठी गो फार म्हणजे आपल्या मुळांच्या दिशेने परत जाणे, ‘स्व‘ला भेटण्यासाठी आतल्या दिशेने करावयाचा प्रवास म्हणजे “गो फार”. सचिन तेंडुलकर आज ज्या स्थानावर आहेत त्याची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली, त्याचा स्रोत आणि त्याचे मूळ यांच्याकडे जाण्याचा हा प्रवास. याचाच एक भाग आहे त्यांची पहिली कार, त्यांची पहिली ८००.
काही वर्षांपूर्वी सचिन यांनी त्यांच्या पहिल्या कारसोबत रीकनेक्ट होण्याची तीव्र इच्छा बोलून दाखवली होती. ते म्हणाले होते, “माझी पहिली कार होती ८००. पण दुर्दैवाने आज ती माझ्यासोबत नाही. ती पुन्हा माझ्यासोबत आली तर मला खूप आवडेल. तर मग, लोकहो तुम्ही जर हे ऐकत असाल तर पुढे या आणि संपर्क साधा…”
स्पिनीच्या इंटीग्रेटेड क्वालिटी सेंटर्समध्ये ८००, बेयर्स ब्ल्यू ही कार अतिशय प्रयत्नपूर्वक, प्रत्येक बारकाव्याकडे काळजीपूर्वक लक्ष देत पुन्हा निर्माण करण्यात आली. आता स्पिनीचे धोरणात्मक गुंतवणूकदार म्हणून सचिन त्यांच्या ८०० सोबत, त्यांच्यातील अस्सल ‘स्व‘ला दर्शवणाऱ्या गोष्टी करताना दिसत आहेत.
एक कॅम्पेन म्हणून “गो फार” व्यक्तिगत आणि सापेक्ष आहे, त्यामुळे यामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती आणि त्यांच्या कहाण्या पाहायला मिळतात, ज्यामध्ये ते आपल्या ‘कम्फर्ट झोन‘च्या बाहेर पडून त्यांना खरोखरीच, अगदी मनापासून जे करायचे आहे ते करताना दिसतात. नवी कार आणि नव्या घराचा आनंद साजरा करणारे कुटुंब असो किंवा गेली कित्येक वर्षे मागे पडून राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारे वयस्क जोडपे असो, चौकटींच्या पलीकडे जाण्याचे त्यांचे प्रवास खूप व्यक्तिगत आहेत.
स्पिनीचे संस्थापक व सीईओ श्री. नीरज सिंग यांनी सांगितले, “जीवनात आणि निवडींमध्ये दूरवर गेले पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. तुम्हाला अगदी मनापासून जी कार खरेदी करायची आहे ती घेता आली पाहिजे कारण तुम्हाला ठाऊक असते की तुमचा खरा आनंद त्यामध्ये आहे. स्पिनीसोबत आम्ही तो अतिरिक्त टप्पा पार करण्यासाठी तयार आहोत, सचिन तेंडुलकर यांच्यासह आमच्या प्रत्येक ग्राहकांसाठी प्रत्येक पावलावर दूरपर्यंत जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यांची पहिली कार त्यांना स्वतःला हवा असलेला, अस्सल आनंद मिळवून देणार होती आणि आम्ही ती प्रत्यक्षात साकार केली. कार ही प्रत्येक घरासाठी स्पेशल खरेदी असते आणि आमच्या प्रत्येक ग्राहकासाठी ती खूप जास्त स्पेशल ठरावी हा आमचा प्रयत्न असतो.”
श्री. सचिन तेंडुलकर यांनी कॅम्पेनमधील आपल्या सहभागाविषयी सांगितले, “कार ही माझ्यासाठी निव्वळ वाहतुकीचे साधन नाही तर त्याहीपेक्षा खूप जास्त आहे. कार म्हणजे माझे दुसरे घर, जीवनात पुढे जाताना, अनेक वेगवेगळ्या ठिकाणांच्या सफरी करताना प्रवासातील माझी साथीदार. आपली कार आपले प्रतिबिंब असते, काहीवेळा आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी असते. जेव्हा स्क्वाड स्पिनीने माझी पहिली कार पुन्हा निर्माण केली तेव्हा ती माझ्यासाठी खूप खास ठरली. या टीमने खूप मेहनत घेतली आणि माझ्या पहिल्या कारच्या सुखद आठवणी माझ्या आयुष्यात पुन्हा याव्यात यासाठी भरपूर मोठा पल्ला पार केला. कारची मालकी यामागच्या भावना स्पिनीसाठी खूप मौल्यवान आहेत आणि म्हणूनच विश्वास, पारदर्शकता व निष्ठा या कालातीत मूल्यांचा अनुभव मिळवून देण्यासाठी ही टीम प्रयत्नशील असते.”
टीव्ही, रेडिओ, ओओएच आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर देखील कॅम्पेन चालवले जाईल. एशिया कप २०२२ दरम्यान डिस्ने+हॉटस्टारवर आणि स्टारस्पोर्ट्सवर देखील हे कॅम्पेन चालवले जाईल.