पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे कोरोना संकट निवारणासाठी विशेष यागाचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी, मृत्युंजय व धन्वंतरी महायाग पार पडला.
कोरोनाचे वैश्विक संकट दूर व्हावे याकरिता मंदिरामध्ये या विविध यागाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ मे २०२१ बुधवार, उग्रनरसिंह व सुदर्शन महायाग होणार आहेत.
वेदमूर्ती नटराज शास्त्री व ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत हे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. हे सर्व धार्मिक कार्यक्रम ट्रस्टच्या यू ट्यूब, फेसबुक, वेबसाइट व सोशल माध्यमांवरून भाविकांना घरबसल्या पाहता येणार आहेत.
‘दगडूशेठ गणपती’ मंदिरात कोरोना संकट निवारणासाठी विशेष याग (व्हिडीओ )
Date:

