मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम
पुणे, दि. 27 : भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात तृतीयपंथी व देह व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाची बैठक संपन्न झाली.
बैठकीत 1 नोव्हेबर ते 30 नोव्हेबर 2021 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. नोव्हेबर 2021 मध्ये 13 व 14 27 व 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.या दिवशी आपल्या नजीकच्या मतदार केंद्रावर किंवा nvsp.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे.
तृतीयपंथीयांना व देह व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची तसेच नवीन मतदार नोंदणी साठी फॉर्म 6, वगळणी करण्यासाठी फॉर्म 7, मतदार यादीच्या तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म 8 कसा भरावा याबाबत माहिती देण्यात आली. भारत निवडणूक आयोगाकडील विविध ॲप व संकेतस्थळे, विशेष करुन मतदान मदत ॲप डाऊनलोड करुन ॲपद्वारे मतदार नोंदणी, वगळणी, दुरुस्ती, नाव तपासणी करण्यात यावी असे आवाहनही निवडणूक शाखेच्यावतीने करण्यात आले.
मतदार नोंदणी अधिकारी यांनी विशेष मोहिमेच्या दिवशी संबंधित संस्थांशी समन्वय साधून तृतीय पंथी व देह व्यवसाय करणाऱ्या महिलांची मतदार नोंदणी वाढावी यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करावे, असे निर्देश उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी दिले. बैठकीला शहरी मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

