बंडखोरांना ‘गद्दार’ म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा” बंडखोर आमदार संतोष बांगरांनी दिली जाहिर धमकी

Date:

मुंबई-अगोदर उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदे आणि ३८ आमदारांनी बंडखोरी केली म्हणून ठाकरेंसाठी अश्रू गाळत बंद्खोरांविषयी स्वतः टीका करणारे आणि नंतर त्याच बंडखोरांना जाऊन मिळणारे बंडखोर आमदार संतोष बांगरांनी मोठे हास्यास्पद विधान करून आपल्या समर्थकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी बंडखोर आमदारांना ‘गद्दार’ म्हणत आहेत. याच मुद्द्यावरून बंडखोर आमदार संतोष बांगर यांनीहे विधान केलं आहे.ते हिंगोली येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

जर तुम्हाला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा, असं संतोष बांगर यांनी उपस्थित शिवसैनिकांना मोठ्केया जोरदार आवाजात सुनावलं आहे. दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “आपण शिवसैनिक आहोत. जर आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी करावं. आम्ही भिणारे शिवसैनिक नाहीत. आमच्या हातामध्ये बांगड्या नाहीयेत. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला जर कुणी आरे म्हटलं तर त्याला कारे नाही, पण कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही, असे आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत, हे ध्यानात ठेवा” असा धमकीवजा इशारा बांगर यांनी दिला आहे.खरंतर, बंडखोरी झाल्यानंतर सुरुवातीला संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांच्या गटात होते. बंडखोरी झाल्याची बातमी समजल्यानंतर बांगर यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियात ‘निष्ठेचा नांगर, संतोष बांगर’ अशी मोहीम देखील पाहायला मिळाली होती.पण यानंतर अवघ्या काही दिवसांत संतोष बांगर यांनी आपल्या विधानापासून यू-टर्न घेत शिंदे गटात सामील झाले. शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून बंडखोर आमदारांना गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढण्याचं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...