सौरव गांगुली ICC क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी

Date:

मुंबई-बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला ICC क्रिकेट समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. अनिल कुंबळे हे गेल्या नऊ वर्षांपासून या पदाचा कारभार सांभाळत होते.अनिल कुंबळे यांची 2012 मध्ये वेस्ट इंडिजच्या क्लाइव्ह लॉयडच्या जागी आयसीसी क्रिकेट समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 2016 मध्ये कुंबळे यांची अध्यक्षपदी निवड झाली होती.आयसीसी क्रिकेट समितीचे मुख्य कार्य क्रिकेटच्या अटी व शर्ती ठरवणे आहे.

वेस्टइंडीजच्या क्लाइव लॉयडच्या जागी अनिल कुंबळे यांना 2012 साली आयसीसी क्रिकेट समितीचे चेअरमन करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा 2016 साली त्यांनी त्याच पदासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा 2019 साली त्यांच्या पदाच्या कार्यकाळात तीन वर्षांची वाढ करण्यात आली. त्यानंतर आता आयसीसीने गांगुलीला अध्यक्षपदी बढती दिली आहे. ते यापूर्वी आयसीसीचे निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

आयसीसी इव्हेंटमधून 1500 कोटी मिळणार-2026 मध्ये आयसीसी भारत, श्रीलंकेसह T20 विश्वचषक आयोजित करणार आहे. त्यानंतर बांगलादेशसोबत देखील 2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. असे सांगण्यात येते कि, या तीन कार्यक्रमांमुळे भारतीय बोर्डाचे 1500 कोटी रुपये वाचणार आहेत. यामध्ये आयसीसीही भागीदार असणार आहे. 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेचे हक्कही भारतीय बोर्डाला मिळाले होते, मात्र ही स्पर्धा UAE मध्ये झाली आहे. त्यामुळे बोर्डाला 10% कर भरावा लागला नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...