सोनिया गांधी यांनी केले डॉ. नितीन राऊत यांच्या ‘मिशन ऑक्सिजन’चे कौतुक

Date:

कोरोनासाठी उपलब्ध होणार दररोज २०७० जंबो सिलेंडर
मुंबई ता. २३ – कोरोना महामारीच्या काळात जाणवणा-या भीषण ऑक्सिजन टंचाईवर मात  करण्यासाठी  राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राबविलेल्या ‘मिशन ऑक्सिजन’या मोहीमेचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कौतुक केले आहे.  राज्यात तीन टप्प्यात हे मिशन राबविले जात असून तीनही टप्प्यानंतर राज्याला दररोज २०७० जंबो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होणार असून यामुळे हजारो लोकांचा जीव वाचवायला मदत होणार आहे.

 कोरोना महामारीच्या काळात उर्जा विभागाने व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाबद्दलची माहिती डॉ. राऊत यांनी श्रीमती सोनिया गांधी यांना पाठविली होती. सोनिया गांधी यांनी उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात या संकटाच्या काळात राज्यातील विविध हॉस्पीटलला ऑक्सीजनचा पुरवठा करण्याच्या कामाचे  कौतुक २१ मे रोजी पाठविलेल्या पत्राव्दारे केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार व कोरोनाचा सामना करण्यासाठी लढा देत असलेल्या राज्यातील लाखो कोरोना योद्ध्यांच्या कार्याला मनापासून पाठिंबा असल्याचे असल्याचे श्रीमती सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.
 औष्णिक वीज केंद्रात वापरल्या जाणाऱ्या  पाण्यात शेवाळ-सूक्ष्मजंतू होऊ नयेत यासाठी त्या पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी ओझोनायझेशन प्लांट स्थापित केलेले असतात. वीजनिर्मितीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन अश्या प्लांट मधून काही अतिरिक्त यंत्रणा उभारून किमान ९५ टक्के शुद्धता राखून पूरक  वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते याचा साधकबाधक अभ्यास करून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे मार्गदर्शनाखाली महानिर्मितीची संपूर्ण यंत्रणा  गतिमानतेने कामाला लागली
या मिशनच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात महानिर्मितीच्या नवीन परळी वीज केंद्राने अवघ्या काही दिवसांत तातडीने युद्ध पातळीवर अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात प्रतिदिन २८८ जम्बो सिलेंडर क्षमतेचा  व ९५.२ टक्के शुद्धतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला. त्यानंतर  प्रति तास ८४ घनमीटर क्षमतेचा अशाच प्रकारचा प्लांट परभणी जिल्हा परिषद कोविड रुग्णालय येथे देखील उभारण्यात आला आहे.
पहिला टप्पा तातडीने मार्गी लावल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात आता खापरखेडा व पारस वीज केंद्रातील  सध्यस्थितीतील ओझोनायझेशन प्लांट नजीकच्या शासकीय रुग्णालय परिसरात स्थलांतरित करून तिथून ऑक्सिजन  निर्मिती साध्य केली जाणार आहे. खापरखेडा वीज केंद्राद्वारे प्रति तास ४२ घनमीटर या क्षमतेने आणि पारस वीज केंद्राद्वारे प्रति तास ५० घनमीटर या क्षमतेने ऑक्सिजन पुरवठा साध्य केला जाणार आहे. तसेच तिस-या टप्प्यात कोराडी(नागपूर), पारस(अकोला) व परळी (बीड) येथे वीज केंद्र परिसरातच रिफिलिंग/बॉटलींग प्लांट उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ते कॉम्प्रेसर्स ,फिल्टर्स व इतर अत्यावश्यक यंत्रसामुग्री तातडीने विदेशातून आयात/देशांतर्गत उपलब्ध  करवून हा तिसरा टप्पा पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...