कोथरूडमध्ये सोमवारी रंगणार ‘सोनेरी चंदेरी’ पहाट

Date:

महक’ प्रस्तुत पंचतारांकित गंधर्वांच्या अजरामर गीतांची-किश्श्यांची अनोखी दिवाळी पहाट
पुणे : भावसंगीताचे किमयागार व सुवर्णकाळाचे शिल्पकार कवी मंगेश पाडगावकर, गायक अरुण दाते, कवयित्री शांता शेळके, संगीतकार श्रीनिवास खळे व यशवंत देव या पंचतारांकित गंधर्वांनी अजरामर केलेल्या गीतांची ‘सोनेरी चंदेरी’ दिवाळी पहाट सोमवारी (दि. १ नोव्हेंबर) कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे. प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांच्या महक प्रस्तुत, माणिक एंटरटेनमेंट निर्मित ‘सोनेरी चंदेरी’ची दिवाळी पहाट मैफल श्रोत्यांना विनामूल्य अनुभवता येणार आहे.
सोबतच मंगेश पाडगावकर यांच्या निवडक कविता, पाडगावकर आणि अरुण दाते यांच्या आयुष्यातील रंजक किस्से अंजली पाडगावकर-कुलकर्णी आणि अतुल अरुण दाते यांच्याकडून ऐकण्याची पर्वणी कोथरुडकरांना मिळणार आहे. ‘सोनेरी चंदेरी’च्या या मैफलीत मनीषा निश्चल यांच्यासह जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी यांचे गायन होईल. केदार परांजपे, प्रसन्न बाम, निलेश देशपांडे, अजय अत्रे, आदित्य आठल्ये, जीवन कुलकर्णी वाद्यांवर साथसंगत करणार आहेत.
मनीषा निश्चल म्हणाल्या, “कोरोनामुळे गेल्या वर्षी दिवाळी पहाटसह इतर कोणतेही सांगीतिक कार्यक्रम होऊ शकले नाहीत. त्यामुळे कलाकारांसह रसिकांसाठीही ही एक पर्वणी आहे. अनेक महिन्यांनंतर आम्ही सर्व कलाकार सादरीकरण करणार असून, रसिकांनी आम्हाला दाद देण्यासाठी आणि आपले कान तृप्त करण्यासाठी ‘सोनेरी चंदेरी’ची पहाट अनुभवण्यासाठी यावे. हा कार्यक्रम विनामूल्य असून, त्याच्या प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध असतील.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात पुणे...

कॅम्पसमधूनच राजकारणाची नवी पिढी निर्माण होईल:खासदार अनुराग सिंह ठाकूर

१५ व्या भारतीय छात्र संसदेचा समारोप. पुणे, २३ फेब्रुवारी: धोरणनिर्मिती,...