पुणे :
समाजातील स्वयंसेवी कामांची गरज लक्षात घेऊन स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी नवीन व्यवस्थापन कौशल्ये, कार्पोरेट ‘सोशल रिस्पॉन्सिबिलीटी’चे निकष लक्षात घेऊन सक्षम व्हावे’ असा सूर सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांच्या मेळाव्यात उमटला.
‘सोशल रिस्पाँसिबीलिटी’ या संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘विवेकानंद पुरस्कार वितरण’ सोहळ्याप्रसंगी ‘टेक महिंद्रा फाऊंडेशन’चे सी एस आर प्रमुख विजय वावरे, ‘वारकरी प्रतिष्ठान’चे महेश शिंदे, ‘सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह’चे दीपक बिडकर, आचार्य अभिषेक पवार आणि ‘दे आसरा’ फाऊंडेशनचे संचालक अनिल पाठक, संपूर्ण महाराष्ट्रातील विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधीही या कार्यक्रमास उपस्थित होते. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे हा कार्यक्रम झाला.
‘समाजात सेवाकार्य करीत असताना प्रशासकीय बाबींचे आणि आर्थिक स्त्रोतांचे भान ठेऊन सेवाभावी संस्थांनी सक्षम होणे गरजेचे असून, यासाठी संस्था चालकांकरीता नियमितपणाने कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले पाहिजे, असे प्रतिपादन ‘विश्वशांती इंटरनॅशनल फाऊंडेशन’चे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर यांनी केले.
अमोल बालवडकर (सामाजिक कार्यकर्ते), रोहन न्यायाधिश (सायबर सिक्युरीटी तज्ज्ञ), यशवंत लायगुडे, ओंकार कोंढाळकर, ज्योती पुंडे, तुषार शेंडे यांना स्वामी विवेकानंद पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ‘सोशल रिस्पाँसिबीलिटी’चे अध्यक्ष विजय वरूडकर यांनी केले तर सुनिल बेनके यांनी आभार मानले. आशिष पोलकडे, उमेश दुगाणी, जगदीश गजऋषी, अॅड. कान्होपात्रा गायकवाड, ओमप्रकाश बिरादर, विशाल वरुडकर यावेळी उपस्थित होते.

