पुणे,दि.२० जानेवारी: “आपल्याकडे असलेली बैद्धिक संपदा सांभाळून त्याला समाजासाठी उपयोगात आणावे. त्या कल्पनेला वस्तूत रुपांतर करून त्याचे उत्पादन करून बाजारात आणावे की नाही हा नंतरचा विचार आहे. आजच्या काळात बौद्धिक संपदेला बौद्धिक मालमत्ता करुन ठेऊ नये. आता यावर विचार करण्याची वेळ आली आहे.” असे विचार केंद्र सरकारचे इनोव्हेशन डायरेक्टर डॉ. मोहित गंभीर यांनी व्यक्त केले.
इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इनव्हेंशनची संस्कृती वाढविण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित ‘इनोव्हेशन हॅकेथॉन २०२२’ स्पर्धेच्या ऑनलाइन उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मॅनेजमेट गुरू अपूर्व नागपाल हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. ही स्पर्धा एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेवर आधारित आहे.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, , प्र कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, डब्ल्यूपीयूच्या सीआयएपीचे वरिष्ठ संचालक प्रविण पाटील, स्कूल ऑफ मॅनेजमेंंटचे संचालक डॉ. श्रीनिवास सुब्बाराव, आर अॅण्ड डीचे अधिष्ठाता डॉ. कृष्णा वर्हाडे आणि डॉ. कृष्ण प्रसाद गुणाले उपस्थित होते.
डॉ. मोहित गंभीर म्हणाले,“ नुकतेच लहान मुलांची खेळणे निर्मिती करण्याची हॅकेथॉन स्पर्धा संपन्न झाली होती. यातील विजेत्यांना कंपन्यानी उत्पादन निर्मिती करण्यास आमंत्रित केले होते. त्यानंतर जवळपास संपूर्ण खेळणे हे भारतीय उत्पादित असतील. आता आम्हाला परदेशातून आयात करण्याची गरज पडणार नाही. बौद्धिक संपदेमध्ये वेगवेगळ्या कल्पनांना मूर्त रुप देणे, तसेच वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कार्य करावे. सुरूवातीला ८५ टक्के खेळणे आयात केली जात होती. हे उत्पादन १.५ ट्रिलियन डॉलरचे आहे. हा व्यवसाय जर भारतात राहिला तर त्यातून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. तसेच सर्वच क्षेत्रात बौद्धिक संपदेचा उपयोग केला तर भारत आर्थिक महासत्ता बनेल.”
अपूर्व नागपाल म्हणाले,“ १९५५ मध्ये फॉर्च्यून सूची मधील ८९ कंपन्या आज नामशेष झालेल्या आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे या कंपन्यांनी उत्पादन क्षेत्रात नव नवीन संशोधन केले नाही. आजच्या काळात टिकण्यासाठी सर्वांनी एक तर संशोधन करावे नाही तर स्वतः संपुष्टात यावे. भविष्यात इलेक्ट्रीक वाहने आणि तंत्रज्ञान हे समाजात अमुलाग्र बदल घडवितील. कोविडच्या काळात व्यवसायाची संकल्पना संपूर्ण बदली आहे. त्यात लग्न मंडप आणि थिएटर हे आता डिलिव्हरी सर्व्हिसचे स्टोरेज झालेले आहेत. असे सांगता येईल की व्यवसायाची परिकल्पना बदललेली आहे. संशोधन हे गरजेचे आहे. सिनेसृष्टीतही ज्यांनी स्वतःत बदल घडविला ते आज ही टिकून आहे.”
प्रा.डॉ.मिलिंद पांडे म्हणाले,“आत्मनिर्भर भारत आणि स्टार्ट अप इंडिया संस्कृती वाढविण्यासाठी स्पर्धेची मदत होणार आहे. यात आयडियाथॉन, वर्क्याथॉन आणि ऑक्टॅथॉन हे तीन गट असतील. विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पना साकार करणे, त्याला मूर्तरुप देणे आहे. यात एकूण ५०० प्रॉब्लेम्स विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. त्यासाठी ४५० मेंटार नियुक्त करण्यात आले आहेत. या मधील १०० प्रॉब्लेम्स स्टेटमेंट्स हे विविध कंंपन्यांकडून प्राप्त झाले आहेत. आता या देशात नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणार्यांची संख्या वाढवायची आहे. माइंड टू मार्केट आणि पेपर टू प्रोडक्ट ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी ही स्पर्धा खूप महत्वाची आहे. ”
प्रा.डॉ.आर.एम.चिटणीस म्हणाले की, सॉफ्टवेअर आणि हार्डवेयर मधील ही स्पर्धा असून. यात विद्यार्थ्यांना सामाजिक कार्य करावयाचे आहे. तसेच त्यांनी स्वागत पर भाषण केले. डॉ. खांडेकर यांनी ही समयोचित विचार मांडले.
डॉ. पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण पाटील यांनी आभार मानले.
बौद्धिक संपदा सांभाळून समाजोपयोगी कार्य करावे- डॉ. मोहित गंभीर
Date:

