Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

म्हणून कृपाशंकर सिंह यांना भाजपात घेतले- फडणविसांनी सांगितले कारण..(व्हिडीओ)

Date:

पुणे-आज पुण्यात ‘दस मे बस ‘ या महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या संकल्पनेवरील उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आले असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला . यावेळी त्यांनी कृपा शंकर सिंह याना का भाजपात घेतले याचे कारणही सांगितले . या पत्रकार परिषदेला त्यांच्यासमवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील महापौर मुरलीधर मोहोळ , सभागृहनेते गणेश बिडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते .

फडणवीस म्हणाले, संपूर्ण देशात कलम ३७० वर काँग्रेस सोडणारे सर्वात पहिले नेते कृपाशंकर सिंह हे होते. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना २० महिन्यांनी आम्ही आमच्या पक्षात प्रवेश दिला. कोणी मतपरिवर्तन करून आमच्या पक्षात येत असेल तर आम्ही त्यांना घेतोच. एखाद्या पक्षातून आमच्या पक्षात आला किंवा आमच्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेला तर कधीतरी दुसऱ्या पक्षाबद्दल वाईट बोललाच असतो. परंतु आमच्या पक्षात आल्यावरच या चर्चा होतात,जेव्हा ते कॉंग्रेस मधून बाहेर पडले तेव्हा ते लगेच भाजपत सामील झाले नाहीत. त्यांनी २०-२१ महिने काश्मीर प्रश्नावर काम केलं आणि दोन वर्षांनी ते भाजपत सामील झाले. त्यांच्या हा प्रवेश एका पक्षातून दुसऱ्या पक्षातला नसून त्यांनी एक विचारधारा सोडत दुसऱ्या विचारधारेचा स्वीकार केला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं होतं.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन प्रचंड गोंधळ झाला. त्या गोंधळादरम्यान धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचे आरोपही करण्यात आले. त्या सर्व गोंधळानंतर भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सरकारला टीकस्त्र सोडले आहे. आताच विधानसभेचे पावसाळी अधिवेशन झाले. कट रचून आमच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ओबीसींच्या मुद्द्यावर सगळी माहिती जाहीर केल्यावर अडचणीत येत असल्याचे लक्षात येताच आमचे आमदार निलंबित केले. यावरुनच सत्ताधारी पक्षांची मानसिकता काय आहे हे लक्षात येते. मुळात, सरकारला ओबीसी आरक्षणात काहीच रस नाही. फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तीन चतुर्थांश निवडणुका होणार आहेत. तिथपर्यंत जर ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर त्यानंतर मिळूनही पुढील सात वर्षे काही फायद्याचे ठरणार नाही. यामुळेच, सरकार फक्त चालढकलपणा करत आहे. त्यांना फेब्रुवारी 2022 पर्यंत फक्ट टाईमपास करायचा आहे. पण, ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर लढाई सुरूच राहणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, मी २२ वर्षांपासून सभागृहात आहे. आणि त्याचे पूर्ण भान ठेवून आणि विश्वासाने सांगतो की, भाजपच्या एकही नेत्याने सभागृहात हाणामारी किंवा शिवीगाळ केलेली नाही. हा यावेळी वाद झाले. मात्र कोणीही नेत्याने पीठासीन अधिकाऱ्याला धक्काबुक्की व मारहाण केलेली नाही. हे सर्व सत्ताधारी पक्षाचे कपोलकल्पित कुभांड आहे, असा आरोप देखील त्यांनी केला. मात्र, कितीही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी विद्यार्थी प्रश्नांवर आवाज उठवत राहणार आहोत.

इंजिनचा प्रॉब्लेम काँग्रेसला, केंद्रातही अन् राज्यातही

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना डबे बदलून उपयोग नाही तर इंजिनमध्ये बिघाड झाला आहे, ते बदलायला हवं अशी बोचरी टीका केली होती. त्या टीकेवर पलटवार करताना फडणवीस म्हणाले, ते डबे बदलून उपयोग नाही तर इंजिन बदलायला हवे हे त्यांचे वक्तव्य काँग्रेसबद्दल बोलत असावेत. कारण, इंजिनचा प्रॉब्लेम काँग्रेसला केंद्रात आणि राज्यात आहे, भाजपल नाही.

अजून किती काळ विरोधी पक्षात बसणार? असे विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जितका काळ विरोधी पक्षात बसायची आज्ञा असेल तितका काळ आम्ही विरोधी पक्षात बसू असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी प्रितम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे यांची नाराजी आणि भागवत कराड यांना मिळालेले मंत्रिपद याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी आणि डॉ. भागवत कराड आम्ही दोघेही मुंडे साहेबांनी तयार केलेलं नेतृत्व आहे. याला पद दिल्याने, याला मंत्री केल्याने याला संपवायचंय वगैरे भाजपामध्ये नसतं. भागवत कराड यांना मंत्री केल्याने जेवढा आनंद मला किंवा पक्षातल्या कार्यकर्त्यांना झाला आहे. त्याच्यापेक्षा जास्त आनंद पंकजाताईंना झाला असेल. कारण भागवत कराड हे मुंडे परिवारातले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्याची संधीही देवेंद्र फडणवीस यांनी सोडली नाही. संजय राऊत पंडित आहेत असं का वाटतं तुम्हाला?, असं विचारला असता, ते सर्वज्ञ आहेत असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं काही नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...