पुणे :’कला तीर्थ ‘ चित्र विद्यालयाच्या चित्र प्रदर्शनाचे उदघाटन बालगंधर्व कलादालन येथे स्मित फौंडेशनच्या दिव्यांग विद्यार्थांच्या हस्ते झाले. १९ मे रोजी सायंकाळी बालगंधर्व कलादालन येथे हे उद्घाटन झाले.
या प्रदर्शनात कला तीर्थ संगीत -चित्रकला विद्यालय च्या विद्यार्थी -शिक्षकांनी तांदूळ – डाळींपासून लोकमान्य टिळक यांची रांगोळी काढली आहे. लोकमान्य टिळक यांची रांगोळी दहा फूट बाय बारा फूट एवढी आहे . ही रांगोळी काढण्यासाठी तीस किलो तांदूळ आणि तीस किलो मुगाची डाळ , काळा मसाला ,मीठ या जिन्नसांचा वापर करून ही रांगोळी काढण्यात आली. रांगोळी काढण्यासाठी सहा तास लागले .
यावेळी ‘कला तीर्थ ‘ विद्यालयाचे प्रमुख अमोल अशोक काळे यांच्या ‘ रंगी रंगले ‘ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी अशोक काळे, ज्येष्ठ लेखक न.म. जोशी, योग शिक्षक श्रीराम साठे ,रिदम वाघोलीकर, राजेंद्र साळुंखे , श्री. परदेशी उपस्थित होते.
उद्धाटनानंतर दिव्यांग विद्यार्थांनी प्रदर्शनाचा फेरफटका मारला.२१ तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.