पुण्यात पाण्यासाठी ..किंवा आणखी पाणी साठवणुकीसाठी कोणतीही योजना राबविण्यात येणार नाही . नाही त्यासाठी जागा आणि पैसा … मात्र बीआरटी-स्काय बस फेल गेल्यावर आता १२०० कोटीची मेट्रो साठी जोरदार हालचाली होत आहेत . सध्या राज्यात दुष्काळ आहे आणि पुण्यात हि आहेच आहे . पुण्याच्या लोकसंख्येचा विचार करता आणि अवलंबून असलेल्या शेतीचा विचार करता येथे पाण्याची साठवणूक अत्यंत मर्यादित स्वरूपात होते आहे आणखी एखादे धरण बांधावे साठवणूक वाढवावी यासाठी कोणतेही प्रकल्प -विचार गेल्या कित्येक वर्षात मांडण्यात आलेले नाहीत मात्र वाहतुकीचा खेळखंडोबा करून हजारो कोटींचे प्रकल्पावर वेगाने काम होत आले आहे . त्यामुळे येथे वाहतुकीचा प्रश्न पाण्याहुन्ही अत्यंत महत्वाचा असे स्वरूप येथे दिले गेले आहे
पुणे मेट्रो प्रकल्प टिपणी
महानगरपालिकेमार्फत सार्वजनिक वाहतूक विषयाचा सर्वकश अभ्यास करण्यात येउन
महानगरासाठी सर्वसमावेशक वाहतूक आराखडा (सीएमपी) तयार करण्यात आला. त्याव्दारे मेट्रो रेल्वे या
मोठया वहन क्षमतेच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा निर्णय पुणे महानगरपालिका मुख्य सभेमार्फत
मार्गिका क्र.1 पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेची लांबी 16.59 कि.मी. पैकी 11.57 कि.मी.
उन्नत व 5.02 किे.मी. भूमिगत असून या मार्गिकेवर 9 उन्नत स्टेशन असून 6 भूमिगत स्टेशनचा
समावेश आहे. वनाज ते रामवाडी या मार्गिकेची लांबी 14.925 कि.मी. असून ही संपूर्ण मार्गिका उन्नत
आहे. व यावर 15 उन्नत स्टेशन्स आहेत.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सप्टेंबर 2008 च्या दराप्रमाणे मार्गिका क्र.१ चा अंदाजित खर्च रूपये
4911 कोटी व मार्गिका क्र.२ चा अंदाजित खर्च रू.2217 कोटी असा एकूण खर्च रू.7128 कोटी लागणार
होता व 2014-15 मध्ये प्रकल्प पूर्णवत्वाचा खर्च रू.(कंप्लीशन कॉस्ट) 9534 कोटी रूपये होता.
यानंतर केंद्रशासनाच्या सूचनेप्रमाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा खर्च ऑगस्ट 2014 च्या सुधारीत दराने
करण्यात आला. मार्गिका क्र.1 चा अंदाजित खर्च रू.5320 कोटी व मार्गिका क्र.2 चा अंदाजित खर्च रू.
2532 कोटी असून एकूण अंदाजित खर्च रू. 7852 कोटी होता व सन 2020-21 मध्ये एकूण पूर्णत्वाचा
अंदाजित खर्च रू.10869 कोटी होता.
यापूर्वी राज्य शासनाने 29 ऑक्टोबर 2013 च्या शासन निर्णय क्र.पीएमआर3313/प्र.क्र.29/युडी-
7 अन्वये मेट्रो रेल प्रकल्पाच्या एकूण 31.5 कि.मी.लांबीच्या टप्पा क्र.1 ला मान्यता दिलेली आहे. केंद्रीय
शहर विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांचे जा.क्र. K – 14011/20/2012-MRTS- IV दि. 11 फेब्रुवारी 2014 चे
पत्रान्वये प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिलेली आहे. प्रकल्पाला केंद्रशासनाच्या दि. 21 ऑक्टोबर 2014
च्या राजपत्राव्दारे मेट्रो रेल्वे अॅक्ट 1978 (कन्स्ट्रक्शन व वक्र्स) तसेच मेट्रो रेल्वे अॅक्ट 2002
(ऑपरेशन् आणि मेंटेनन्स) लागू करण्यात आला आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी (एस.पी.व्ही.) नोंदणी प्रक्रियेसाठी
राज्यशासनाच्या विधी व न्याय विभागामार्फत आर्टिकल ऑफ असोसिएशन व मेमोरॅंडम ऑफ
असोसिएशनचे मसूदे केंद्रशासनाकडे पत्र क्र. PMR-3314/C.R. 69/UD-7 नगर विकास विभाग, मंत्रालय,
मुंबई दि. 28 एप्रिल 2015 अन्वये मंजूरीस्तव पाठविणेत आला आहे.
. मार्गिका क्र.2 वनाज ते रामवाडी मेट्रो जमिनीवर किंवा भुयारी याबाबत लोकप्रतिनिधी तसेच
स्वयंसेवी संस्थांनी काही मुद्दे उपस्थित केल्यामुळे मा.मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या
अध्यक्षतेखाली शनिवार दि.07 मार्च 2015 रोजी कौन्सिल हॉल पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली
होती. मार्गिका क्र.1 बाबत कोणाचाही आक्षेप नसल्याने ही मार्गिका मंजूर करण्यात आली व मार्गिका क्र.2
जमिनीवर किंवा भुयारी बाबत सूचना आल्याने या मार्गिकेचा अभ्यास करण्यासाठी मा.पालकमंत्री यांच्या
नियंत्रणाखाली एक समिती नेमण्यात आलेली असून समिती सदस्यांनी याविषयी दि.11 मार्च 2015, 19
मार्च 2015 व 13 एप्रिल 2015 रोजी बैठका घेतल्या व या समितीच्या सदस्यांनी आपले प्रस्ताव/पर्याय दि.
16 मार्च 2015 रोजी मा. महापालिका आयुकत यांचेकडे सादर केले. मार्गिका क्र. 2 वनाज ते रामवाडीबाबत
समितीमधील सदस्यांचे प्रस्ताव/पर्याय व समितीचा याबाबतचा अहवाल दि. 20 एप्रिल 2015 रोजी मा.
प्रधान सचिव (1) नगर विकास यांचेकडे सादर केला आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाबाबत केंद्रीय परिवहन मंत्री मा.श्री.नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली
महाराष्ट्र, सदन, नवी दिल्ली येथे दि.9 सप्टेबर 2015 रोजी आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये
राज्य सरकारने मा. पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशी व दिल्ली मेट्रोने
बनविलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डिपीआर) स्विकारून पहिल्या टप्प्यातील काम त्वरीत सुरू करण्याचा
निर्णय या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या बैठक अहवालानुसार मेट्रोचा मार्ग उन्नत (एलिव्हेटेड)
स्वरूपाचा तर आवश्यक्तेनुसार भुयारी आणि नदीकाठाने जाणारा असणार आहे.
नव्या बदलांनुसार मेट्रो मार्गिका क्र.2 खंडुजीबाबा चौक मार्गे नदीकाठाने बालगंधर्व
महापालिका भवन, धान्य गोडाऊन (कामगार पुतळा),संगम ब्रिज मार्गे पुणे स्टेशनवरून पुढे पूर्वीच्याच
आराखडयानुसार रामवाडी पर्यंत एलिव्हेटेड (उन्नत) जाणार आहे. या बदलाप्रमाणे मार्गिका क्र.२ ची लांबी
14.665कि.मी.इतकी असणार आहे. नोव्हेंबर 2015 च्या दरानुसार मार्गिका क्र.१ चा अंदाजित खर्च रूपये
5333 कोटी मार्गिका क्र.२ अंदाजित खर्च रू.2794 कोटी व एकूण अंदाजित खर्च रू.8127 कोटी व
प्रकल्पाचा पूर्णत्वाचा सन 2022-23 अंदाजित खर्च रू.11522 कोटी असणार आहे.
पी आय बी बैठक व केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीद्वारा प्रकल्पास आर्थिक सहभागासह अंतिम
मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाची पुढील कार्यवाही होऊ शकणार आहे.


