पुणे- प्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय यांना पाठविलेल्या राष्ट्रीय उच्च्तर शिक्षा अभियान, महाराष्ट्र शासन यांच्याकडून १० एप्रिल, २०१८ च्या पत्रानुसार फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा असे सूचित केले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाला २०१६ साली स्वायत दर्जा प्राप्त झालेला आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) महाराष्ट्र शासन यांच्याकडून मिळालेल्या पत्रानुसार १९ एप्रिल, २०१८ रोजी महाविद्यालयाने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. महाविद्यालयास स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, (रुसा) महाराष्ट्र शासन यांच्या पूर्वापेक्षित अटीची पूर्तता करावी लागणार आहे. महाविद्यालय स्वायत असावे. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात मंजूर शिक्षक पदांच्या ८५% भरती असणे गरजेचे आहे. महाविद्यालयाने शैक्षणिक, प्रशासकीय आणि आर्थिक दृष्ट्या ७५.४ कोटींचा प्रस्ताव राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, (रुसा) महाराष्ट्र शासन यांना पाठविला आहे. महाविद्यालय वेगवेगळ्या विषयांतील शैक्षणिक केंद्रे (School) स्थापन करणार आहेत. उदा. स्कुल ऑफ बायो-सायन्सेस, स्कुल ऑङ्ग क्रीएटीव सायन्सेस, स्कुल ऑफ अर्थ, एनर्जी व एनव्हायर्मेंट. तसेच महाविद्याल कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास यासाठी वेगळी केंद्र उभारत आहे. तसेच भौतिक सुविधा हा विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होण्यासाठीच्या प्रस्तावचा मोठा आणि महत्वाचा घटक आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयास स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होण्यासाठीचा प्रस्ताव
Date:

