पुणे, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने साईबाबा शताब्दीच्या निमित्ताने साईबाबांनी धारण केलेल्या चर्म पादुका पुणेकरांसाठी उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती साईगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिली आहे.
शनिवार पेठेतील न्यायमूर्ती रानडे बालक मंदिरात रविवारी (ता. १५ एप्रिल) पहाटे पाच ते रात्री दहा या वेळेत भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. कोल्हापूरच्या करवीर पीठाचे श्री शंकराचार्य स्वामी विद्या नरसिंह भारती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पहाटे भूपाळी, तुकाराम दैठणकर व सुरेश लोणकर यांचे सनई वादन, साईबाबांच्या पादुकांना अभिषेक व उटी लेपन पूजा, श्रीविष्णू सहस्त्रनाम पठण, साई ग‘ंथाचे सामुदायिक पारायण, सबका मालिक एक हे सत्यश्री महाराजांचे प्रवचन, गुरुपाठ, भजन असे धार्मिक कार्यक‘म आयोजित करण्यात आले आहेत.
साई संस्थांचा विश्वस्तांचा शताब्दीनिमित्त सन्मान करण्यात येणार आहे. साईगंगा प्रतिष्ठान, साईदास मंडळ आणि साईबाबा पालखी सोहळा समिती यांनी या कार्यक‘माचे संयोजन केले आहे.
साईबाबांनी धारण केलेल्या पादुका रविवारी पुण्यात
Date:

