पुणे -नवभारत निर्मिती संकल्प-सिध्दीच्या वतीने शहरातील ७५० अभिजात नृत्य कलाकारांच्या साधनेचा आविष्कार असलेला नृत्योत्सव न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेच्या मैदानावर संपन्न झाला . या कार्यक्रमाद्वारे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाची जनजागृती करण्यात आली अशी माहिती समन्वयक योगेश गोगावले यांनी दिली आहे.
भरतनाट्यम्, कथक, कुचिपुडी, ओडिसी या भारतीय शास्त्रीय नृत्य शैलींचे सादरीकरण करण्यात आले.गुरु मनिषा साठे, सुचेता चापेकर, गुरु शमा भाटे, नीलिमा अध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अठरा नृत्य संस्थांतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या
नृत्यभारती, मनीषा नृत्यालय, नादरुप, कलावर्धिनी, नुपूरनाद, आर्टिट्यूड, शांभवीज, कलासक्त, नृत्यधाम, नृत्यप्रेरणा, सुनाट्य अमृतवर्षा, नृत्योन्मेष, चिदंबरम, नृत्यप्रिया आणि ओडिसी अशी या संस्थांची नावे आहे.







