पुणे, ता. २२ – विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिकता यावे याची जबाबदारी पोलिसांची आहे, त्याबरोबर शहराच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांबरोबर विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असल्याचे मत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ‘पोलिस मित्र’ या उपक‘माचे उद्घाटन करताना श्रीमती शुक्ला बोलत होत्या. सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विकास काकतकर, शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, बसवराज तेली यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस मित्र भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.
श्रीमती शुक्ला पुढे म्हणाल्या, ‘शहराची लोकसंख्या सत्तर लाख आहे आणि पोलिसांची सं‘या केवळ नऊ हजार इतकी आहे. नागरिक आणि पोलिस यांनी एकत्र येऊन काम केल्यास शहरात सुरक्षितता ठेवणे सोपे जाईल. त्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे. गैरकृत्यांची निर्भयपणे माहिती कळवावी.’
पोलिस उपायुक्त हिरेमठ यांनी बडीकॉप आणि सिटीसेफ या उपक्रमांची माहिती दिली. सहायक पोलिसआयुक्त गणेश गावडे यांनी पोलिसमित्र या उपक्रमाची माहिती दिली. पर्यवेक्षिका डॉ. सविता केळकर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनी ‘पोलिसकाका’ या विषयावरील पथनाट्य सादर केले. छेडछाड, रॅगिंग, दादागिरी, अंमली पदार्थांचे सेवन या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ‘पोलिसमित्र’ उपयुक्त असल्याचा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला. किशोर गरड यांनी लेखन आणि ओमकार कांबळे यांनी दिग्दर्शन केले.
शहराच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा – पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला
Date:

