पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फीरोदिया विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विधेयक विश्लेषण स्पर्धेत बेगलोरच्या अलायन्स विद्यापीठाने पहिला क्रमांक मिळविला. श्रीशिष्या मिश्रा आणि मोहम्मद अरीफ यांनी प्रतिनिधित्व केले.
मुर्ंबीच्या शासकीय विधी महाविद्यालयाने दुसरा क्रमांक मिळविला. खुबी अगवालने प्रतिनिधित्व केले. रायपूरच्या हिदायतुल्ला राष्ट्रीय विधी विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळविला. साधव संबाकैलास यांनी प्रतिनिधित्व केले.
सुप्रसिध्द विधिज्ञ ऍड. अभय आपटे यांनी परीक्षण केले. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ट विधिज्ञ विदुष्पद सिंघानिया यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. क्रीडाविषयक कायदा क्षेत्रात काम करणार्यांची संख्या या कमी असल्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या अधिक संधी उपलब्ध असल्याचे मत श्री. सिंघानिया यांनी व्यक्त केले. प्राचार्या डॉ. रोहिणी होनप अध्यक्षस्थानी होत्या. राधा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुधीर नरोटे यांनी आभार मानले.
राष्ट्रीय विधेयक विश्लेषण स्पर्धा
Date:

