पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहनमहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि व्ही. पी. पेस ऍकॅडमी आणि पुणे जिल्हा व अखिल भारतीय मराठी बुध्दिबळ संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्य खुल्या जलद बुध्दिबळ स्पर्धेत विश्वजित नायक, गौरव झगडे, शिवराज पिंगळे, प्रथमेश शेर्ला यांनी विविध वयोगटांमध्ये विजेतेपद पटकाविले.
बीएमसीसीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या स्पर्धेत ५ ते ७२ वयोगटातील २६२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. ८, १२, १६ व खुला अशा चार गटात या स्पर्धा झाल्या. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. ज्येष्ठ बुध्दिबळ मार्गदर्शक जोसेफ डिसूझा, व्ही. पी. चेस असोसिएशनचे सचिव वंदन पोतदार, ऍकॅडमीचे अध्यक्ष उदयचंद्र कवडी, पुणे जिल्हा चेस असोसिएशनचे सचिव राजेंद्र कोंडे, स्पर्धेचे प्रायोजक जयप्रकाश सुराणा, अनिल पवार यावेळी उपस्थित होते. राजेंद्र कोंडे यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे
८ वर्षांखालील गट ः प्रथमेश शेर्ला, वरद नांदुर्डीकर, ध्रुपद पठारी
१२ वर्षांखालील गट ः शिवराज पिंगळे, अनुज दांडेकर, श्रीपाद नाईक
१६ वर्षांखालील गट ः गौरव झगडे, अमित धुमाळ, ओ लांबमाने
खुला गट ः विश्वजित नायक, केवल निर्गुण, गौरव हगवणे