पुणे – आधुनिक विज्ञानाच्या क्षितिजावर ज्या गोष्टींची आज चर्चा केली जाते, त्या गोष्टी स्वामी विवेकानंदांनी शंभर वर्षांपूर्वी सांगितल्या होत्या. त्यावरुन त्यांचा विज्ञानाचा अभ्यास आणि वैज्ञानिक द्रष्टेपण लक्षात येतेअसे मत विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटनमंंत्री प्रा. जयंत सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केले.
विज्ञान भारती आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसर्या विश्व वेद विज्ञान संमेलनात आज विवेकानंद जयंतीनिमित्त ‘द्रष्टे वैज्ञानिक स्वामी विवेकांनद’ या विषयावर प्रा. सहस्रबुध्दे बोलत होते. सावित्रीबाई ङ्गुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर अध्यक्षस्थानी होते. विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर, प्रा. सुरेश सोनी यांची प्रमुख उपस्थिती होती.
वैदिक विज्ञानाच्या आधारावर आधुनिक विज्ञानातील सर्व सिध्दांत मांडले गेले आहेत. एकीकरणाचा सिध्दांत मांडणे हे आधुनिक विज्ञानाचे उद्दीष्ट आहे. परंतु आधुनिक विज्ञानाला हा सिध्दांत आजही मांडता आलेला नाही. भारताच्या उत्कर्षासाठी विज्ञानवादी दृष्टिकोन आवश्यक आहे. पूर्व व पश्चिमेच्या समन्वयातून भारताची प्रगती होऊ शकेल हे विवेकानंदांचे विचार होते असेही प्रा. सहस्रबुध्दे यांनी सांगितले.
विवेकानंदांनी ब‘म्हांडनिर्मितीची वेदातील संकल्पना स्पष्ट केली, उर्जा आणि वस्तू परिवर्तनीय असल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते, उर्जा अक्षयतेचा सिध्दांत मांडणार्या आईनस्टाईनला याची माहिती होती, सापेक्षवादाच्या सिध्दांतावर त्यांनी मत व्यक्त केले होते, इंडियन इन्स्टिट्यूट ऑङ्ग सायन्सची निर्मिती विवेकानंद व जमशेदजी टाटा यांच्या कल्पनेतून झाली, संन्याशाने धर्माबरोबर विज्ञानाचा प्रसार करावा असे त्यांचे मत होते, अशी माहिती प्रा. सहस्रबुध्दे यांनी दिली.
जपानमधील युवक स्वतःच्या ज्ञानावर देशाचा विकास करीत आपल्या देशाला पुढे नेत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारताना ते पश्चिमेचे अनुकरण करत नाहीत. जपानमधील युवकांची देशभावना भारतीयांनी जाणीव घ्यावी अशी विवेकानंदांची अपेक्षा होती.
डॉ. करमळकर म्हणाले, ‘मी भूगर्भशास्त्राचा विद्यार्थी आहे. ब‘म्हांडाची निर्मिती कशी झाली याची वेदविज्ञानात माहिती आहे. आधुनिक विज्ञानाशी ती सुसंगत आहे. त्यामुळे वेदविज्ञानाकडे दुर्लक्ष न करता त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.’
तिसर्या वेदविज्ञान संमेलनात आज सकाळी ‘सूर्यनमस्कार सहपरिवार’ या उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते. या उपक‘माला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रा. बी. व्ही. जोशी यांनी वास्तुकला आणि वैदिक विज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. संस्कृत, योगा, जीवनशास्त्र, वेदिक व्यवस्थापन, पुरातत्वशास्त्र, वास्तुकला, कृषि व गोविज्ञान, आरोग्य या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते.