पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या १३३ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक‘मात सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते संस्थापकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह प्रा. आनंद भिडे, संचालक राम निंबाळकर, प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुणवत्ता आणि कार्यक्षमता या दोन गुणांच्या आधारे अधिकाधिक चांगले काम करण्याचा संकल्प करुन तो सिध्दीला नेण्यासाठी योग्यप्रकारचे नियोजन करण्याचे आवाहन डॉ. कुंटे यांनी यावेळी केले. प्राचार्य परदेशी यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य प्रकाश पवार यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
१ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेपासून डेक्कन एज्युकेशन सोसायटीने शिक्षण कार्यात प्रवेश केला. हे औचित्य साधून राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांच्या हस्ते पर्यावरण पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वृक्षारोपण, पर्यावरण, अध्यपन, क‘ीडा, संगीत, इंग‘जी साहित्य, प्रशिक्षण आदी क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्या शिक्षक व प्राध्यापकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. शरद कुंटे, पर्यावरण शिक्षण विभागाचे राष्ट्रीय संयोजक सदाचारीसिंह तोमर, सोसायटीचे कार्यवाह आनंद भिडे, संचालक किरण शाळिग‘ाम, राम निंबाळकर, आजीव सदस्य डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांची उपस्थिती होती.
फर्ग्युसनचा ‘डिपार्टमेंटल फस्ट’ उत्साहात
– डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ‘डिपार्टमेंटल फस्ट’ उत्साहात साजरा करण्यात आला. अभ्यासाला पूरक असणारी आणि माहिती देणारी विविध विषयांवरील प्रदर्शने, व्या‘यानमाला, परिसंवाद, चर्चा, गटचर्चा, प्रचार ङ्गेर्या आणि ‘स्पंदन’ या सांस्कृतिक कार्यक‘मांचा सहभाग होता.
मराठीचे मायबोली, इंग‘जीचे वॉलस्ट्रीट, इतिहासाचे ऍण्टिक्यूरम, भूगोलाचे फ्लिम्टस, मानसशास्त्राचे सायङ्गी, रसायनशास्त्राचे अल्केम, इलेक्टॉनिक्सचे इलेक्ट्रोनिका, प्राणीशास्त्राचे झून, छायाचित्राचे ङ्गोटासिंक आदी २८ विभागांनी आपआपल्या विषयांतील माहितीचे प्रदर्शन केले. विविध १५ शाळांमधील आठ हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेटी दिल्या.
‘स्पंदन’ या सांस्कृतिक कार्यक‘मात नृत्य, नाट्य, संगीत, वाद्य वादन, पारितोषिकप्राप्त एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले. अभिनेता भाऊसाहेब शिंदे यांच्या हस्ते या कार्यक‘माचे उद्घाटन करण्यात आले. कथ्थक, भरतनाट्यम, लावण्या, भांगडा, गरबा आदी विविध प्रांतातील नृत्य सादर करण्यात आली. १७० गटातील पंधराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ऋग्वेद सोमण लिखित भेट ही सावरकर व सुभाषचंद्र बोस यांच्या मुंबईतील भेटीचे वर्णन करणारी एकांकिका, लैंगिक शिक्षण देणारे जाधवर करंडक विजेते पथनाट्य, घोरपडेच्या बैलाला घो हे बक्षिसपात्र नाटक ही या कार्यक‘माची वैशिष्ट्ये होती. पारंपरिक दिनानिमित्त विविधप्रकारच्या वेशभूषा करून विद्यार्थी आले होते.

