पुणे- आमदार माधुरी मिसाळ यांनी नागपूर अधिवेशनात केले तरी काय ? असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा हि यादी पाठविण्यात आली . ..वाचा …
आमदार माधुरी मिसाळ यांचा नागपूर अधिवेशनातील सहभाग
१. सिंहगड रस्त्त्यावर पोलीस स्टेशन व पोलीस चौकी उभारण्याकरिता आवश्यक जागा महापालिकेकडून तातडीने ताब्यात घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. या ठिकाणी पोलीस स्टेशन व चौकी बांधण्यासाठी चार कोटी रुपयांची मागणी केली.
२. स्वारगेट येथे वाहतुकीच्या नियोजनासाठी इंटिग्रेटेड ट्रॅफिक हब उभारण्यासाठी विविध खात्यांच्या अधिकार्यांची एकत्रित बैठक तातडीने आयोजित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले
३. बिबवेवाडीतील ईएसआय रुग्णालयाचे केवळ विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. याठिकाणी कामगार रुग्णांबरोबरच ससूनच्या धर्तीवर सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांच्यासमवेत बैठक घेण्याचे आश्वासन कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले
४. सॅलिसबरी पार्क येथे मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमीमध्ये विविध प्रकारची विकासकामे करण्याकरिता अल्पसंख्यांक मंत्रालयाकडून पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्याबाबत अल्पसंख्याकमंत्री विनोद तावडे यांनी मंजूरी दिली.
५. पर्वती व विठ्ठलवाडी देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन विविध विकासकामे करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली
६. पाचगाव पर्वती वन क्षेत्रात विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी १ कोटी १३ लाख रुपयांच्या विशेष निधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपलब्ध करून दिला
७. ज्येष्ठ नागरिकांचे धोरण जाहीर करावे, केंद्राच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांच्या पात्रतेसाठी वयोमर्यादा ६५ वरुन ६० वषे करावी यासाठी सभागृहात मागणी केली
८. शहर व जिल्ह्यात वाळूचे वितरण व पुरवठा यावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण नल्याने महसुली उत्पन्न कमी होत असल्याचे औचित्याच्या मुद्द्या द्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले
९. राज्यातील उत्पादन शुल्क विभागातील स वर्गातील पदे रिक्त असल्याबाबत तसेच पुणे महापालिकेतील विधी सल्लागार विभागातील अधिकारी व कर्मचारी संगनमताने गैरव्यवहार करीत असल्याबाबत आदी तारांकित प्रश्नांद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले.