पुणे, ता. १२ – गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, अथर्वशीर्षाचे पठन आणि ढोल-ताशांच्या गजरात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेतील २१६० विद्यार्थ्यांनी आज शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याचा विक‘म प्रस्थापित केला.
आर्टस ऍण्ड क्रिएटिव्हिटी या विभागाअंतर्गत वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने या विक‘माची नोंद करून मान्यता दिली आहे. संस्थेचे प्रमुख पवन सोलंकी यांनी प्रमाणपत्र शाळेला प्रदान केले. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष विकास काकतकर, शाला समितीचे अध्यक्ष दिलीप कोटिभास्कर, मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी, डॉ. एस. एन. कानिटकर, डॉ. सविता केळकर, शिल्पकार अभिजीत धोंडाङ्गळे यावेळी उपस्थित होते.
या विक‘मासाठी गेल्या आठ दिवसांपासून प्रशालेत तयारी सुरू होती. कला शिक्षक जयंत टोले आणि संदीप माळी यांच्या मार्गदर्शनाखाली २५०० किलो शाडू माती मळून त्याचे गोळे करण्याचे काम पूर्ण केले. शिल्पकार अभिजीत धोंडाफळे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना गणेश मुर्त्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले.
आज सकाळी उत्साहावर्धक वातावरणात गणेश मूर्ती बनविण्याचे काम सुरू केले. प्रत्येक वर्गात ६० याप्रमाणे २१६० मुर्त्या तयार करण्यात आल्या. पुढील शनिवारी या मुर्त्या विद्यार्थी घरून रंगवून आणणार आहेत. त्यातील सर्वोत्कृष्ट मुर्तीची शाळेत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
मु‘याध्यापिका तिलोतमा रेड्डी यांनी प्रास्ताविक, सुहास देशपांडे यांनी सूत्रसंचालन, दीपाली चौगुले यांनी परिचय आणि उपमु‘याध्यापिका स्नेहल कुलकर्णी यांनी आभार मानले.