पुणे, दि. 9 – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत ऋषिपंचमीनिमित्त ऋषितुल्य व्यक्तिंचा सन्मान करण्यात आला. नाटककार डॉ. सतीश आळेकर, मुलाखतकार सुधीर गाडगीळ, स्वरूपवर्धिनीचे शिरीष पटवर्धन, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. दिलीप देवधर व डॉ. शरद आगरखेडकर, देहू संस्थेचे माजी अध्यक्ष ह. भ. प. शिवाजीराव मोरे या माजी विद्यार्थ्यांचा सन्मानार्थींमध्ये समावेश होता. मुख्याध्यापक सुनील शिवले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. हेमंत पाठक यांनी प्रास्ताविक, सुहास देशपांडे यांनी सूत्रसंचालन, दीप्ती डोळे व दीपाली सावंत यांनी परिचय आणि शुभांगी पाखरे यांनी आभार मानले, पर्यवेक्षक दिलीप रावडे व सुरेश वरगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.