पुणे, ता. 21 –
‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘फर्ग्युसन महाविद्यालया’तील विद्यार्थ्यांनी ‘अमृतवर्षा’-एक दिवस शेतकर्यांसाठी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या 45 विद्यार्थ्यांनी खेड तालुक्यातील शिवे गावाला भेट दिली. शेतकर्यांशी संवाद साधला. शेतीची प्रक्रिया समजून घेतली. ग्रामीण भागातील समस्यांवर चर्चा केली. प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संतोष फरांदे, प्राध्यापक शिवाजी कोकाटे, डॉ. सोनालिका पवार यांनी संयोजन केले.
‘डीईएस सेकंडरी स्कूल’मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन
‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘डीईएस सेकंडरी स्कूल’मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत पद्मनाभ अदमाने आणि कुमुद जगदे यांनी सतरा वर्षांखालील गटात विजेतेपद मिळविले. चौदा वर्षांखालील गटात आरुष गद्रे आणि श्रावणी उंडले यांनी विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत 85 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी विद्यार्थिनी आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू आकांक्षा हगवणे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका ज्योती बोधे यांच्या मार्गदर्शनाखाली सरिता स्वादी, विजया जोशी, प्रविण जाधव, सचिन घाडगे, सुनेत्रा वेदपाठक यांनी संयोजन केले.


