नवीन मराठी शाळेत बाल वारकर्‍यांचा प्रतिकात्मक रिंगण सोहळा तर गोळवलकर गुरुजी विद्यालयात आरोग्य दिंडी

Date:

पुणे, ता. 8 ः ‘डेक्कन ऐज्युकेशन सोसायटी’च्या ‘नवीन मराठी शाळे’त बाल वारकर्‍यांचा प्रतिकात्मक रिंगण सोहळा पार पडला. विठ्ठल-रुक्मिणी आणि संतांच्या वेषभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. पालखी पाठोपाठ अश्वाचे आगमन झाले. भगव्या पताका फडकावीत, टाळ-मृदुंगाच्या गजरात, माऊली-माऊली, ग्यानबा तुकाराम असा विद्यार्थ्यांनी जयघोष केला. डोईवर तुळशी वृंदावन घेऊन विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. चोपदाराने रिंगण लावल्यानंतर अश्वाने तीन फेर्‍या पूर्ण केल्या. विठ्ठल नामाच्या गजराने शाळेचा परिसर दुमदुमून गेला. सामाजिक कार्यकर्ते पीयूष शहा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यश्री हजारे, मीनल कचरे, तनुजा तिकोने, धनंजय तळपे, रूपाली सावंत, सोनाली मुंढे यांनी संयोजन केले. 

गोळवलकर गुरुजी विद्यालयात आरोग्य दिंडी
डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालया’त आरोग्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ‘निरोगी शरीरात निरोगी मन वास करते’ या उक्तीनुसार सातवीतील विद्यार्थ्यांनी विशेष परिपाठ सादर केला. आरोग्याचे महत्त्व, सकस आहार, व्यायाम, स्वच्छ व शुद्ध हवा, स्वच्छता अभियान याचा या परिपाठात समावेश होता. संहिता पेशवे या विद्यार्थिनीने विठ्ठलाची गोष्ट सांगितली. अग्रणी साठे या विद्यार्थिनीने आरोग्यदायी गोष्टी सांगितल्या. सर्व विद्यार्थी पारंपरिक पोशाख परिधान करून आले होते. अभंग, भक्तिगीते आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात सारा परिसर दुमदुमून गेला होता. मुख्याध्यापिका मंजुषा खेडकर यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...