प्लास्टिक बंदी स्वातंत्र्य चळवळ व्हावी- पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेश शेंडे

Date:

पुणे, ता. 1 ः पर्यावरणीय समस्यांवर मार्ग काढण्यासाठी शाश्वत पर्याय म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेली प्लास्टिक बंदी ही आणखी एक स्वातंत्र्य चळवळ व्हावी, विद्यार्थ्यांनी या चळवळीत सकि‘य सहभाग घ्यावा, असे आवाहन पर्यावरणतज्ज्ञ आणि तेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेश शेंडे यांनी केले.

आजपासून केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामानबदल मंत्रालयाच्या निर्णयानुसार 1 जुलैपासून प्लास्टिकबंदी लागू केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर जनजागृती करण्यासाठी मानवी साखळी करण्यात आली होती. या वेळी शेंडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, प्रा. रुपाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. परदेशी म्हणाले, ‘2 ऑक्टोबर 2019 रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात ‘सिंगल यूज प्लास्टिक फ्री कॅम्पस’ हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. तीन वर्षांनी ऑक्टोबर 2021 मध्ये तो यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. त्यानुसार शंभर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आणि वस्तूंवर परिसरात बंदी आहे. कॅरीबॅग, वस्तूंच्या सुरक्षेसाठी केले जाणारे प्लास्टिक पिशव्या, डिश, ग्लास, थर्माकॉलचा वापर केला जात नाही. दैनंदिन कचर्‍यातील प्लास्टिकचा कचरा कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी रोजच्या वापर्‍यातील प्लास्टिकच्या वस्तूंचा पर्याय ठरणार्‍या पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला जात आहेत.’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...