गरिबांच्या विकासासाठी भाजप वचनबद्ध : गिरीश बापट
पुणे ता. १२. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता या योजना गरिबांपर्यंत पोहचवण्याचे काम करतो. भारतीय जनता पार्टी गरिबांचा विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले. भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या मार्फत आयुष्यमान भारत योजनेतील १२०० लाभार्थ्यांना आरोग्य कार्ड वितरण सोहळा आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण तसेच आयुष्यमान भारत योजनेच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन ही करण्यात आले.
या कार्यक्रमाला पुणे शहर भाजप सरचिटणीस दत्ता खाडे, शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, नगरसेवक प्रकाश उर्फ बंडू ढोरे, नगरसेवक अजय खेडेकर, शिवाजीनगर भाजप सरचिटणीस आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, अनिल भिसे, उत्तम बहिरट, रमेश नाईक, गणेश स्वामी, सुप्रिया खैरनार, सोनाली भोसले, सुप्रीम चोंधे, सौरभ कुंडलिक, नितीन बहिरट, रोहित भिसे, राजू पिल्ले, आयुष्यमान भारत योजनेचे पुण्याचे समन्वयक मयूर कदम, जितेंद्र गायकवाड, , पंकज सोमावार, संतोष भिसे, अविनाश कांबळे, नितीन गायकवाड, संजय भोसले , सुमित आल्हाट, समीर भुते, मिलिंद मोरे, सुनील दैठणकर, आनंद माने, अनिल माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
खासदार बापट म्हणाले, आयुष्यमान भारत हे आयुष्यभर तुमच्या सोबत आहे. काही लोक औषधोपचाराला पैसे लागतात औषधोपचार करून घेत नाहीत. अशा लोकांसाठी नरेंद्र मोदींनी ही योजना आणली आहे. औषधोपचाराशिवाय कोणी माणूस जर दगावला तर आमच्या दृष्टीने ते अत्यंत अयोग्य आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण नोव्हेंबर पर्यन्त गरिबांना आपण मोफत धान्य देत आहोत. रिक्षाचालक, घरकामगार मजूर, पथारीचालक, यासारख्या लोकांसाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता काम करत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2018 साली या योजनेचा शुभारंभ केला. ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्यमान भारत’ योजना महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना केंद्र शासनाकडून 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येतो. शासनाने निवडलेल्या शासकीय व खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतो. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
सुनील माने यांनी औंध , बोपोडी भागातील नागरिकांसाठी आजपर्यंत कर्तव्य भावनेतून धान्य वाटप, रिक्षा चालकांसाठी सीनजी कूपन, थर्मामीटर गन, सॅनिटायजर, मास्क वाटप, घरेलू कामगार महिलांना धान्य वाटप केलेल्या कामांची माहिती दिली. कोरोना काळात मोफत ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटिव्ह मशीनची सुविधा उपलब्ध करून देणे, गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य वाटपासाठी निधी, सर्वसामान्यासाठी रेशन कार्ड आदी सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती दिली. येणाऱ्या काळात लोकांसाठी केंद्राच्या अनेक योजना राबवणार असल्याचे सांगितले. नगरसेवक अजय खेडेकर यांनी केंद्र सरकारच्या योजनांबद्दल माहिती दिली.

