पुणे, ता. २० जून : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्रायमरी स्कूलमध्ये अभिनव पुस्तक पेढी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत ३०० पालकांनी गेल्या वर्षीचे पुस्तक संच शाळेत जमा केले आणि २०० पालकांना पुस्तक संचांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना, आर्थिक शिस्त आणि पर्यावरण जागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुषा पुराणिक, अश्विनी भट, जीवन अभ्यंकर यांनी संयोजन केले. पालक-शिक्षक संघाचे विशेष सहकार्य लाभले.

