पुणे, ता. १५ – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ऑनलाइन उपक्रमांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, डीईएस प्रायमरी आणि प्री प्रायमरी स्कूल, मा. स. गोळवलकर पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये ऑनलाइन वर्गांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. शारदा स्तवन, शिक्षक-पालकांचे आशीर्वाद, वैशिष्ट्यपूर्ण पपेट शो, गाणी, गोष्टी, खेळ यांचे आयोजन करण्यात आले होते. छोटा भीम, बाल गणेश आदी कार्टून व्यक्तिरेखांच्या संवादातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शाळा, शिस्त यांची माहिती सांगतील. फुगे, फुले, रांगोळी, झिरमिळ्यांनी शाळेचा आवार सजविण्यात आला होता. रानडे बालक मंदिरात ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त ८५ पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या.

सलग दुसर्या वर्षी ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू होत आहेत. नवीन मराठी शाळा, गोळवलकर गुरूजी प्राथमिक शाळा, डीईएस प्रायमरी स्कूल, न्यू इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल या शाळांनी अभिनव उपक‘मांचे आयोजन केले होते. नवीन मराठी शाळेने शाळेच्या पहिल्या दिवसाची वैशिष्ट्यपूर्ण चित्रङ्गित विद्यार्थ्यांसाठी तयार केली होती. या चित्रङ्गितीद्वारे शाळेतील घंटा वादन, शाळेचा सुशोभित केलेला परिसर, परिपाठ, प्रार्थना शिक्षकांची लगबग, वर्ग, ऑनलाइन शिक्षण यंत्रणा आदींचा विद्यार्थ्यांना अनुभव घेता आला. गोळवलकर गुरुजी शाळेत विद्यार्थी आणि पालकांना एकत्रित मार्गदर्शन करण्यात आले. पक्ष्यांच्या शाळेच्या गीताने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यास मदत झाली.
अहिल्यादेवी प्रशाला, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल, गोळवलकर गुरूजी विद्यालय, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या माध्यमिक शाळांमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले. सरस्वती पूजन, लॅपटॉपचे पूजन, प्रार्थना, परीपाठ, विद्यार्थी परिचय, सुट्टीतील अनुभवांवर आधारित गप्पा गोष्टी, वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांचे पालकांनी घरी केलेल्या स्वागताची छायाचित्रांची फेसबुक वर प्रसिद्धी असे उपक्रमांचे स्वरूप होेते.


