नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा आवाज विधानसभेत मांडणार – आमदार विनोद निकोले

Date:

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दखल घ्यावी

डहाणू / नवी मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) नवी मुंबई विमानतळ मध्ये बाधित प्रकल्पग्रस्तांचा गंभीर प्रश्न येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार असल्याचे माकप आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी सांगितले आहे. त्याच बरोबर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दखल घ्यावी असे त्यांनी आवाहन केले आहे. गेले महिनाभर कोकण भवनासमोर सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आमदार कॉ. विनोद निकोले यांनी भेट दिली आणि प्रश्न समजून घेतले.

यावेळी निकोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी व्हावा यासाठी सर्वप्रथम 1997 मध्ये नवी मुंबई येथे विमानतळ व्हावे हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र 2007 मध्ये या प्रकल्पाला शासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला. नवी मुंबई विमानतळासाठी एकूण 2268 हेक्टर जमीन लागणार असून त्यातील 671 हेक्टर जमीन ही 10 गावांतील प्रकल्पग्रस्तांची आहे. यात येथील घरे, जमिनी, पारंपारिक व्यवसाय, मासेमारी या सगळ्यावर पाणी सोडावे लागतेय आणि त्यातच आता हा प्रश्न आहे भावी पिढीच्या भविष्याचा. याच प्रकल्पाच्या बाजूच्याच उलवा इथल्या खाडीत भराव टाकला जात आहे. यामुळे खाडी किनाऱ्या लगतच्या मच्छिमारांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे तसेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पुनर्वसन पॅकेजनुसारच मच्छिमारांचेही पुनर्वसन केले जावे. तसेच येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी 10 गावांनी दि. 23/12/2019 पासून गेले महिनाभर रात्रंदिवस हे आंदोलन सुरू ठेवले आहे. त्यात 03 वेळा बैठका सिकडो अधिकारी यांच्या सोबत झाल्या पण त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. म्हणून आता दि. 16/01/2020 रोजी पासून आमरण उपोषण येथील गावकऱ्यानी सुरू केले आहे. आमरण उपोषणाला बसलेल्या लोकांची परिस्थिती चिंता जनक असून सिडको च्या कार्यालय जवळ असून सुद्धा सिडको चे अधिकारी याकडे विचार करत नाही, हि दुर्दैवी गोष्ट आहे. आमरण उपोषणाला इतके दिवस झाले तर सरकार यांच्या मरणाची वाट पाहत आहे का ? प्रश्न उपस्थित करत आमदार निकोले यांनी खेद व्यक्त केला. या 10 गावांमध्ये 3800 घरे उठवण्यात आली असून त्यांचा संपूर्ण संसार उधवस्त होत आहे. याबाबत सिडको ने महाराष्ट्र शासन मंत्रालय यांच्याशी समन्वय साधून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा अन्यथा हे आंदोलन अत्यंत उग्र रूप धारण करेल असा इशारा आमदार कॉ. निकोले यांनी दिला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रशांत जगताप यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष...

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...