‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी’ दिवाळीसाठी गृहोपयोगी साहित्याचे प्रदर्शन व विक्री
पुणे, ता. २ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवभारत निर्मिती संकल्प ते सिध्दी अभियानाला प्रतिसाद देत ‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी’ या दिवाळीसाठी आवश्यक असणार्या गृहोपयोगी स्वदेशी साहित्याचे प्रदर्शन ४ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत म्हात्रे पूलाजवळील सिध्दी गार्डन येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती समन्वयक योगेश गोगावले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.
बुधवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार असून, उद्योजिका अरुणा ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मेक इन इंडिया, स्किल इंडिया या शासनाच्या योजनांना प्रतिसाद देत महिला बचतगटांकडून महिलांची मानसिकता महिला उद्योगगटांकडे नेण्याच्या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांच्या व्यवस्थापनातून महिलांच्यामार्ङ्गत स्वस्त व दर्जेदार स्वदेशी उत्पादने प्रदर्शनात विक‘ीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आकाश कंदील, पणत्या, रांगोळी, पूजा साहित्य, अत्तरे, लाईटच्या माळा, तयार कपडे, साड्या, डे्रस मटेरियल, लहान मुले व पुरुषांचे कपडे, बॅगा, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, विविध प्रकारची पिठे, भाजण्या, लोणची, मसाले, पापड आदींचे १५० हून अधिक स्टॉल प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. सकाळी १० ते रात्री ८ प्रदर्शनाची वेळ असल्याची माहिती संयोजिका शशिकला मेंगडे यांनी दिली आहे.