पुणे, ता. १७ ः डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत विनादप्तर उपक‘माअंतर्गत माता पालक संघाच्या वतीने ‘स्वामीनी ग‘ुप’च्या मंगळागौर खेळांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळागौरीच्या खेळांतून होणारे व्यायाम, अभिव्यक्ती, सूसूत्रता, सण, व‘त या मागील वैज्ञानिक दृष्टिकोन, कला, मनोरंजन आदी माध्यमांतून प्रबोधन करण्यात आले. जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतीय संस्कृतीबद्दल प्रबंध सादर करणार्या डॉ. सविता केळकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मु‘याध्यापिका कल्पना वाघ, वंदना कदम, अंजली रानडे यांनी संयोजन केले.
रमणबागेत संस्कृत दिन साजरा
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत संस्कृत दिनानिमित्त संस्कृत गीत गायन, स्तोत्रपठन, संस्कृत कथा आणि संस्कृत पोवाड्यांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतची गोडी लागावी यासाठी या उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते. मु‘याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत विभाग प्रमुख शारदा जोशी यांनी संयोजन केले. वर्षा गानू यांनी आभार मानले.

