पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त पुणे विद्यापीठाच्या अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राच्या सहाय्याने विशेष कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. चारुता प्रभुदेसाई यांनी लिहिलेल्या ‘समतेचे दीप अंतरी लावू’ या गीताचे गायन केले. संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक हर्षद गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णा भाऊंच्या विविध रचना सादर केल्या. नाट्य विभागाचे प्रमुख रविंद्र सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मिहिर देशपांडे, मल्हार परळीकर, कार्तिक बहिरट यांनी ‘स्मशानातील सोनं’ या अण्णा भाऊंच्या कथेचे अभिवाचन केले.
डॉ. भंडगे आणि विद्यापीठ अधिसभेच्या सदस्या बागेश्री मंढाळकर यांनी मार्गदर्शन केले. मु‘याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका रजनी कोलते, वैशाली भोकरे, महेश जोशी यांनी संयोजन केले.
रमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी
Date: