लोकसहभागातून विकासाचा नवा आदर्श : सनी विनायक निम्हण

Date:

पुणे :
लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ पद नाही, तर जनतेच्या विश्वासाची जबाबदारी असते. नागरिकांचे प्रश्न समजून घेणे, त्यावर ठोस उपाय योजना करणे आणि लोकांशी थेट संवाद साधणे, हीच लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा असते. मात्र जेव्हा हा लोकप्रतिनिधी उच्च शिक्षित, आधुनिक दृष्टिकोन असलेला आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करणारा असतो, तेव्हा विकासाची दिशा अधिक वेगळी आणि परिणामकारक ठरते. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन पुण्यात सक्रिय समाजकारणातून राजकारणात उतरलेले सनी विनायक निम्हण हे त्याचे ठळक उदाहरण आहेत.

कल्पक विचार, स्पष्ट धोरण आणि लोकांचा सक्रिय सहभाग या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवत सनी निम्हण काम करत आहेत. लोकांच्या सहभागातूनच आदर्श प्रभाग आणि सक्षम समाज घडू शकतो ही त्यांची ठाम भूमिका असून, त्याच विचारधारेतून त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे.

पुणे महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना सनी निम्हण यांनी Policy, Planning आणि Public Participation (3P) या संकल्पनेवर आधारित कार्यपद्धती प्रभावीपणे राबवली. याचाच भाग म्हणून त्यांनी ‘Solve with Sunny’ या अभिनव उपक्रमाअंतर्गत
‘विकासासाठी सूचना देऊया – सगळे मिळून आदर्श प्रभाग घडवूया’ हा लोकाभिमुख स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. तसेच प्रभागात आठ ठिकाणी सूचना केंद्र उभारण्यात आले होते.शेकडो नागरिकांनी QR कोड स्कॅन करून, Google Form भरून प्रभागाच्या विकासासाठी थेट संपर्क साधून आपल्या सूचना मांडल्या. त्या ठिकाणी नागरिकांनी प्रत्यक्ष येऊन आपल्या सूचना, अपेक्षा व्यक्त केल्या, तक्रारी नोंदवल्या. या सर्व सूचना, तक्रारींचा चा सखोल अभ्यास करून त्या आगामी वचननाम्यात समाविष्ट करणार असून, पुढे हाच वचननामा प्रत्यक्षात विकासनामा ठरेल, असा विश्वास सनी निम्हण यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी सनी निम्हण’स्वतः प्रभागातील सोसायट्या आणि वस्ती विभागात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत.

माजी आमदार विनायक निम्हण यांचा समृद्ध राजकीय व सामाजिक वारसा सनी निम्हण यांना लाभला आहे. त्या वारशाला आधुनिक शिक्षण, आंतरराष्ट्रीय अनुभव आणि नव्या विचारांची जोड देत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राजकारणाबरोबरच समाजकारणातही त्यांचा सक्रिय सहभाग कायम राहिला आहे.

माजी नगरसेवक असलेले सनी निम्हण हे पुन्हा एकदा औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांच्या संयुक्त वतीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि शाश्वत विकास या तीन आधारस्तंभांवर प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रोजगार महत्वाचा, त्यासाठी शिवसेना उद्योग भवन उभारणार : आबा बागुल

महिला बचत गटासह तरुणांसाठी रोजगारनिर्मितीला चालना मिळणार पुणे दि. महिला...

पुण्यात नागरी समस्या आ वासून उभ्या:रॅपच्या माध्यमातून प्रशासनावर अजित पवारांची टीका; एक अलार्म पाच काम कॅम्पेन सुरू

चुकीचे पाणीवाटप, कचरा व्यवस्थापन नीट नाही-महापालिकेची बिघडलेली अवस्था दुरुस्त...

प्रचारादरम्यान शिंदेंचा उमेदवार कुरेशींच्या पोटात चाकू भोसकला

मुंबई-मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच वांद्रे (बांद्रा)...

गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांची पुण्यात प्रचार रॅली आणि सभांचा धडाका

पुणे. दि.७: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना,...