पुणे – ऐलमा पैलमा गणेश देवा, एक लिंबू झेलू बाई, कारल्याचा वेल लाव सुने, असं कसं झालं माझ्या नशिबी आलं, अक्कल माती चिकन माती, आडबाई आडोनी अशी पारंपरिक गाणी म्हणत निवारा वृध्दाश्रमातील ज्येष्ठ महिलांनी भोंडल्याचा आनंद लुटला.
सुयोग मित्र मंडळ आणि चतुःशृंगी मंदीर ट्रस्टच्या वतीने चतुःशृंगीच्या यात्रेत आजीबाईंच्या भोंडल्याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ महिलांनी आपल्या बालपणीच्या आठवणी जागवल्या. ङ्गेर धरत, झिम्मा आणि ङ्गुगड्या खेळत महिलांनी आनंद लुटला. खिरापत वाटपानंतर देवीच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी बोलताना चतुःशृंगी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य गंगाधर अनगळ म्हणाले, भोंडला हा पश्चिम महाराष्ट्र व कोकणात प्रचलित असलेला महिलांचा सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतिक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून तिच्या भोवती महिला व मुली ङ्गेर धरतात. पृथ्वीच्या सुङ्गलीकरणाचा हा उत्सव आहे. वृध्दाश्रमातील महिलांना गतस्मृतींना उजाळा देता यावा आणि आनंद मिळावा यासाठी गेली सात वर्षे सुयोग मित्र मंडळाच्या सहकार्याने या उपक‘माचे आयोजन करण्यात येते. नंदा माने, अश्विनी अदवडे, वर्षा खामकर, मनीषा तडके, सारिका धुमाळ, अनुराधा मांडवकर, मनीषा सुपेकर, संगीता वाईकर, रंजना पवार, सुवर्णा कानिटकर, सुनंदा मोहिते, पल्लवी शर्मा यांनी संयोजन केले.