भांबुर्डा वन उद्यानाचा लोकार्पण सोहळा…

Date:

पुणे-गोखलेनगरमधील मेंढी फार्म येथे आमदार विजय काळे यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या भांबुर्डा वन उद्यानाचा लोकार्पण सोहळा राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते येत्या सोमवारी (ता. ३ जून) सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. आमदार विजय काळे कार्यक‘माचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पुणे (प्रादेशिक) मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ऐ, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

भांबुर्डा वन उद्यानाची वैशिष्ट्ये
१. पुणे शहरातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असणारे उद्यान ः १४ एकर
२. आयुष वन, लुप्त होणार्‍या प्रजातींचे वन, गणेश वन, सुगंधी वन, नवग‘ह वन, पंचवटी वन, औषधी वन, नक्षत्र वन, फळ उद्यान, वड जातींच्या वृक्षांचे उद्यान, पाम उद्यान, उपयुक्त प्रजातींचे उद्यान, स्मृती वन, बांबू वन, किचन बाग वन अशा विविध विभागांमध्ये वनउद्यानाची रचना करण्यात आली असून, १४ हजार वृक्ष व वेलींची लागवड करण्यात आली आहे
३. नागरिक विशेषतः विद्यार्थ्यांना पर्यावरणाची ओळख व्हावी यासाठी निसर्ग परिचय केंद्र
४. पर्यावरण विषयक कार्यक‘मांसाठी खुले सभागृह, चित्रफिती दाखविण्याची सुविधा
५. विद्यार्थ्यांच्या शारीरीक व मानसिक विकासासाठी साहसी खेळ, मैदानी खेळ, प्राण्यांच्या प्रतिकृती व खेळांचे साहित्य, मतिमंद विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विभाग
६. व्यायामासाठी ओपन जिम, योग केंद्र, ङ्गिरण्यासाठी निसर्ग पाऊलवाटा, बसण्यासाठी कठडे व मनोरे
७. उद्यानात ४ वन तलाव खोदून पाणीसाठा करण्यात आला आहे. ओढे, नाले यांना दगडी पिचिंग करून नागरिकांना पाणी अडविण्याची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. जमिनीची धूप थांबविणे आणि पाणी अडविण्याचे महत्त्व नागरिकांना कळावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर गॅबियन वॉल उभारण्यात आली आहे.
८. लाकडी आभासाचे पूल, भव्य प्रवेशद्वार, आकर्षक भित्तीचित्रे, रंगीबेरंगी फुले, विविध प्रकारचे गुलाब, मनमोहक धबधबा, सुंदर प्रकाश व्यवस्था, नैसर्गिकपणे केलेली सजावट यामुळे उद्यानाच्या सौंदर्यात भर पडली आहे

आमदार विजय काळे :
‘भांबुर्डा वनउद्यान हे एक सुंदर, आधुनिक, आरोग्यदायी, पर्यावरण व निसर्गाची माहिती देणारे, नैसर्गिक, शैक्षणिक, मनोरंजनदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. गोखलेनगर, शिवाजीनगर, पत्रकारनगर, पाषाण, कर्वेनगर, कोथरुड आदी परिसरातील नागरिकांसाठी फिरण्यासाठी, व्यायामासाठी, शुद्ध नैसर्गिक हवेसाठी, पर्यावरण शिक्षणासाठी आणि निसर्गाचे अलौकिक सौंदर्य अनुभवण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास वाटतो. वनउद्यानाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पुढील टप्प्यांत विविध विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध दिला जाईल.’

पार्श्‍वभूमी
भांबुर्डा वन विभागातील ही जागा पूर्वी मॅफको कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. कंपनीचा करार संपल्यानंतर हे क्षेत्र ओसाड होते. मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला होता. विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, अनिरुध्द उपासना केंद्राचे स्वयंसेवक यांनी स्वच्छता, वृक्ष लागवड, रोपांना पाणी देणे अशी मदत सातत्याने केली. आमदार विजय काळे यांच्या संकल्पनेतून वनउद्यान निर्माण करण्यात आले आहे. त्यासाठी एक कोटी ७२ लाख रुपये खर्च झाला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...