पुणे, ता. १५ – चतुःशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गंगाधर अनगळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यकारी विश्वस्त सुहास अनगळ, सुहास प्रभाकर अनगळ, नरेंद्र अनगळ, श्रीरंग अनगळ उपस्थित होते.एका भाविकाने देवीसाठी सोन्याचे हाररुपी मंगळसूत्र अर्पण केले आहे. त्याची अंदाजे किंमत पंधरा लाख रुपये असून वजन ४४३.४०० ग‘ॅम इतके आहे
या वर्षीचा नवरात्रौत्सव गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सुरू होत असून मंदिरात सकाळी ९ वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे. सकाळी सहापासून अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करणे हे धार्मिक विधी होणार आहेत. या वर्षीचे सालकरी रवींद्र अनगळ असून नारायण कानडे गुरुजी पौरोहित्य करणार आहेत.
उत्सव काळात मंदिर २४ तास खुले राहणार आहे. गणपती मंदिरात रोज दुपारी सहा भजने होणार आहेत. शनिवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता सुयोग मित्र मंडळाच्या वतीने वृध्दाश्रमातील महिलांसाठी आजीबाईंचा भोंडला होणार आहे.
शुक‘वार दिनांक २९ सप्टेंबर रात्री ८ पासून नवचंडी होम होणार आहे. शनिवार दिनांक ३० सप्टेंबर विजयादशमीनिमित्त दुपारी ५ पासून सीमोल्लंघनाची मिरवणूक मंदिरापासून सावित्रीबाई ङ्गुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत काढण्यात येणार आहे. बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुते, वाघ्या, मुरळी, देवीचे सेवेकरी यांचा मिरवणुकीत समावेश असून, हेलिकॉप्टरमधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
यात्रेमध्ये पूजा व प्रसाद साहित्याचे सात स्टॉल आणि अन्य ३० स्टॉल असणार आहेत. पोलीस, होमगार्ड, खाजगी सुरक्षा रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षकांची सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात येणार आहे. व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरुध्द सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक मदत करणार असून, सुरक्षितेसाठी २० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
महापालिकेतर्ङ्गे किटकनाशकांची ङ्गवारणी, कचरा उचलण्यासाठी जादा कंटेनर, पाणी निर्जंतुकीकरण करणे, ग‘ीन हिल्स ग‘ुपच्या सहकार्याने निर्माल्याचे खत निर्माण करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
सुयोग मित्र मंडळाच्या वतीने तातडीचे वैद्यकीय मदत केंद्र व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली असून, अग्निशामक दलाची गाडी २४ तास उपलब्ध होणार आहे. पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची सुविधा देण्यात येणार आहे. दर्शन घेऊन भाविकांना लवकरात लवकर बाहेर पडता यावे यासाठी बॅरिगेटसची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंदिर परिसरात रंगरंगोटीची कामे करण्यात आली असून, मंदिरावर विद्युत रोषणाई, वीज गेल्यास जनरेटरची सोय करण्यात आली आहे. सर्व भाविकांना यात्रेसह संपूर्ण वर्षाचा मंदिराच्या परिसरात २ कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. रांगेत उभे राहाणार्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची विनामूल्य व्यवस्था करण्यात आली आहे.