पुणे-फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयातील इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या निरोप समारंभाच्या अल्पोपहारासाठी ठेवलेला निधी ‘पुलवामा’ येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी दिला. त्या प्रसंगी SIRF (soldier independent rehabilitation foundation)च्या सुमेधा व योगेश चिंधडे यांना २५०००/- रु. चा धनादेश सुपूर्त करण्यात आला. शिक्षकांनीही व शिक्षकेतर कर्मचार्यांनी उस्फुर्तपणे जमा केलेली रक्कम त्यांना सुपूर्त करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी, उपप्राचार्य एन.ए. कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ. सविता केळकर तसेच पालक शिक्षक संघाच्या रुबिना शेख व श्री. संजय रसाळ व शिक्षकांपैकी श्री. जगदीश पाटील व सौ. उज्ज्वला गोरे उपस्थित होते. सुमेधा चिंधडे यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल त्यांना शाबासकी दिली. डॉ. शरद कुंटे याप्रसंगी म्हणाले की, आम्हाला या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो, तर प्रायार्यांनी, विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक म्हणून घडविण्याच्या यशस्वी प्रयत्नाबद्दल पालकांचे अभिनंदन केले
फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयातील निरोप समारंभ
Date:

