पुणे- सेवा प्रॉडक्शनच्या वतीने स्वरायन – शास्त्रीय संगीत ते सुगम संगीताची वाटचाल हा गीतांचा कार्यक्रम रविवार, ता. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता कोथरुडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पहिल्यांदाच सादर करीत आहे.
शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत यांचा सूरांचा ताळमेळ श्रोत्यांपुढे आणण्याचा प्रयत्न आहे. शास्त्रीय संगीतातील ठुमरी, रागदारी, गझल, एखाद्या रागातून पुढे जात असताना त्याचा स्वर पकडून दुसर्या त्याच धाटणीच्या रागात जाणे आणि मग एखादे सिनेसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत किंवा अभंग सादर करणे हा प्रवास सुप्रसिध्द निवेदक राहुल सोलापूरकर उलगडून दाखविणार आहेत.
रेवा नातू आणि धवल चांदवडकर यांनी या कार्यक‘मासाठी गाणी गाणार आहेत. मुकुंद पेटकर हार्मोनियमवर, अमृता ठाकूरदेसाई की बोर्डवर, विक्रम भट तबल्यावर आणि अजय अत्रे परकशन्स्वर साथ संगत करणार आहेत. सेवा चौधरी यांनी कार्यक‘माची निर्मिती केली आहे.
स्वरायन – शास्त्रीय संगीत ते सुगम संगीत वाटचाल
Date:

