पुणे- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचा कलश (गुरुवार, ता. २३ ऑगस्ट) सकाळी साडेदहा ते दुपारी ३ या वेळेत जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान, भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पुणेकरांनी दर्शन घेऊन आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्री तसेच प्रदेश अध्यक्षांच्याकडून काल पालकमंत्री गिरीश बापट यांनी पंतप्रधान श्रध्येय अटल बिहारी वाजपेयीजीं यांचा अस्थिकलश स्वीकारला. हा अस्थिकलश पुणेकरांच्या दर्शनासाठी आज सकाळ पासून ठेवण्यात आला. दुपारी ३ वाजेपर्यंत हॉटेल सन्मान येथील भाजप कार्यालयात या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यात आले.त्यानंतर आळंदी नगरपरिषदेजवळ काही काळ दर्शनासाठी ठेऊन इंद्रायणी नदीत अटलजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. शहर अध्यक्ष योगेश गोगावले, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे,महापौर मुक्ता टिळक, सरचिटणीस उज्वल केसरकर,उपाध्यक्ष दत्ता खाडे, कोषाध्यक्ष विनायक आंबेकर, कार्यालय मंत्री उदय जोशी, जिल्हा सरचिटणीस सचिन सदावर्ते,संजय मयेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अस्थीकलशाचे पूजन करून अटलजींना अभिवादन करण्यात आले.




