पुणे, ता. २४ ः पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे आवाहन करित आज सकाळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नवी पेठ परिसरात प्रबोधन फेरी काढली.
शाडू मातीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करा. पूजेसाठी लागणार्या पत्रीचा वापर टाळा. निर्माल्य नदीत टाकू नका. ध्वनी प्रदूषण करु नका आणि चिनी मालावर बहिष्कार टाका असे संदेश दिले.
लोकमान्य टिळकांना अपेक्षित असणारा आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला घेतली. शिक्षिका माधुरी ठकार यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरे गरण्याचे महत्व पटवून दिले. मुख्याध्यापीका कल्पना धालेवाडीकर, पर्यवेक्षक विकास दिग्रसकर यांनी मार्गदर्शन केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गोळवलकर विद्यालयाची प्रबोधन फेरी
Date: