नामदेव संजीवन समाधीदिनानिमित्त कार्यक्रम
पुणे – श्री संत नामदेव महाराजांच्या ६६७ व्या संजीवन समाधीदिनानिमित्त नामदेव समाजोन्नती मंडळ पश्चिम विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक कामत, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, गुरुनानक दरबाचे अध्यक्ष संतसिंग मोखा ‘संत नामदेव यांचे चरित्र व शिकवण’ या विषयावर विचार मांडणार आहेत.
संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘नामानंद’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून ह. भ. प. रामचंद्र वणवे यांचे कीर्तन, पूजा व अभिषेक, भजन, हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ऍड. सुधीर पिसे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. शनिवारी (ता. २२ जुलै) दुपारी १२ वाजता घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवन येथे हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती अध्यक्ष रमेश हिरवे यांनी कळविली आहे.
——-
नामदेव समाजोन्नती मंडळ
पश्चिम विभाग, गोखलेनगर, पुणे
श्री संत नामदेव महाराज ६६७ वा संजीवन समाधीदिन सोहळा
स्थानिक कार्यक्रम
शनिवार, ता. २२ जुलै २०१७
नामानंद स्मरणिका प्रकाशन, हरिपाठ, भजन, कीर्तन, गुणवंतांचे सत्कार
प्रमुख उपस्थिती – डॉ. अशोक कामत, डॉ. रामचंद्र देखणे, संतसिंग मोखा
अध्यक्ष – सुधीर पिसे
स्थळ – नेहरु सांस्कृतिक भवन, घोले रोड
वेळ – शनिवार, २२ जुलै दुपारी १२ वाजता
—–