स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना मदत करण्यासाठी कायमस्वरूपी ट्रस्ट उभारणार – आ.चंद्रकांतदादा पाटील

Date:

पुणे-स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना मदत करण्यासाठी कायमस्वरूपी ट्रस्ट उभारणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले स्वच्छता सेवक सर्वांना हवे असतात,आपण साखर झोपेत असताना ते संपूर्ण परिसर स्वच्छ करुन जातात पण त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही,येवढेच काय तर आपल्या साठी येवढे मोलाचे कार्य करणाऱ्या सेवकांना कधी चहा सुद्धा विचारला जात नाही हे बदलले पाहिजे. समाजाचा स्वच्छता सेवकां प्रतीचा दृष्टीकोण बदलला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार असून त्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात येइल व या ट्रस्ट च्या माध्यमातून स्वच्छता सेवक व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना जे आवश्यक आहे ते पुरविण्यात येइल असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
क्रिएटिव्ह फौंडेशन आणि प्रसन्न पर्पलच्या वतीने प्रभाग १३ मधील ५ आरोग्य कोठ्यांच्या अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माझा भाग स्वच्छ भाग अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.यावेळी क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,विश्वस्त व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,प्रसन्न पर्पलचे प्रमुख प्रसन्न पटवर्धन,नगरसेवक दीपक पोटे,नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे,वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे,स्पर्धा परीक्षक राजभाई तांबोळी,प्रा.अनुराधाताई एडके,गणेश खिरीड,शहर चिटणीस प्रशांत हरसुले,जयश्रीताई तलेसरा,संगीताताई आदवडे,सुवर्णाताई काकडे,माणिकताई दीक्षित,प्रभाग १३ चे अध्यक्ष राजेंद्र येडे,सरचिटणीस निलेश गरुडकर,ॲड. प्राचीताई बगाटे,बाळासाहेब धनवे,कोथरूड महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे,सरचिटणीस केतकी कुलकर्णी,ओ बी सी आघाडी अध्यक्ष रमेश चव्हाण,सौरभ अथणीकर,सारंगशेठ राडकर,रामदास गावडे,शंतनू खिलारे,चंद्रकांत पवार,जनार्दन क्षीरसागर, इ मान्यवर उपस्थित होते.
इंदूर शहर हे सर्वात स्वच्छ शहर गणले गेले कारण येथील सर्व घटक प्रशासन,स्वच्छता कर्मचारी,नागरिक व लोकप्रतिनिधी एकत्र आले व त्यांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा निर्धार केला. त्याच धर्तीवर पुणे ही सर्वात स्वच्छ शहर व्हावे यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असल्याचे संयोजक संदीप खर्डेकर यांनी सांगितले.लवकरच शहरातील सर्वच स्वच्छता सेवकां साठी अशी स्पर्धा आयोजित करुन त्यात नागरिक व आरोग्यदूतांचा सहभाग वाढवून त्यांना स्वच्छ पुणे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रेरित करण्यात येइल असेही खर्डेकर म्हणाले.
आरोग्यदूतांना नागरिकांची साथ मिळाली तर पुणे ही सर्वात सुंदर शहर होवू शकेल असे मत प्रसन्न पटवर्धन यांनी व्यक्त केले.इंदूर शहरातील नागरिक अभिमानाने सांगतात की माझे शहर हे सर्वात स्वच्छ शहर आहे त्याच धर्तीवर आपल्या पुण्यातील नागरिकांना आपल्या शहराविषयीचा अभिमान वाटला व त्यांनी सहभाग वाढविला तर नक्कीच पुणे ही स्वच्छ शहर होवू शकते असेही ते म्हणाले.परदेशात गेल्यावर आपण तिथली टापटीप बघून कौतुक करतो पण आपल्या शहरात मात्र जागा मिळेल तिथे कचरा टाकतो हे बदलले पाहिजे असे मत ही प्रसन्न पटवर्धन यांनी व्यक्त केले.
माझ्या प्रभागातील स्वच्छता सेवकांच्या सोयीसाठी मी मोठ्या प्रमाणावर घंटागाड्या खरेदी केल्या असून त्याच बरोबर माझा प्रभाग हरित प्रभाग असल्याने झावळ्यांचा कचरा,पालापाचोळा,फांद्या अश्या कचऱ्याचा संकलनासाठी विशेष व्यवस्था केली असल्याचे सांगितले व यासाठी अधिक गाड्यांची व्यवस्था आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच मनपा चे स्वच्छता कर्मचारी उत्तम काम करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरल्याचे ही त्या म्हणाल्या.
परीक्षक म्हणून फिरताना मला ह्या स्वच्छता सेवकांच्या अडचणी कळल्या त्यांचे दु:ख समजले,त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या भावना समजल्या आणि हे सेवक किती महत्त्वाचे काम करतात याची जाणीव झाली असे परीक्षक अनुराधाताई एडके यांनी सांगितले.
दोघीच्या बोलण्यातील हाच धागा पकडून चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतून अश्या गाड्या उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले तसेच या प्रकारची स्पर्धा सर्वत्र घ्यावी व त्याच्या प्रमुख पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती करत असल्याचे ही जाहीर केले. ( सोबत दादांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप पाठवत आहे )
अतिशय भव्य पारितोषिक मिळविणाऱ्या सर्व पारितोषिकविजेते सेवकांनी शब्दशः अश्रूंनी आपल्या भावनांना वाट करुन दिली.
पारितोषिक विजेते खालीलप्रमाणे …
महिला विजेत्यांची नावे –
प्रथम – एक ग्रॅम सोन्याचा हार. सुमन भाग्यवंत.
द्वितीय – पैठणी.कमल खंडाळे.
तृतीय – नथ व कानातील डूल.सविता पारधे.
तीन उत्तेजनार्थ बक्षीसे – साडी.संगीता गाडे,राधाबाई साबळे,सारिका उकिरडे.

पुरूष विजेत्यांची नावे-
प्रथम – डिजिटल स्मार्ट वॉच.दस्तगीर शेख.
द्वितीय – २५०० गाण्यांचा कारवां with bluetooth speaker. विशाल साळूंखे.
तृतीय – प्रवासी बॅग.सुरेश बेनकर.
उत्तेजनार्थ – लंच बॉक्स.तानाजी चव्हाण,किशोर भोंडवे,अशोक शेलार.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...