सिस्कातर्फे अद्यावत BT4070X पॉवरफुल बेस वायरलेस स्पीकर्स लाँच

Date:

नवा स्पीकर अतिशय खास पोर्टेबल म्युझिक प्लेयर असून घरी तसे बाहेरच्या वापरासाठी सर्वोत्तम

मुंबई – सिस्का अक्सेसरीज या मोबाइल अक्सेसरीज क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने BT4070X हा पॉवरफुल बेस वायरलेस स्पीकर लाँच केला आहे. या वायरलेस ब्लुटुथ स्पीकरमधे एचडी बेस बसवण्यात आल्यामुळे तो संगीताला सुस्पष्ट ध्वनी देतो. सिस्काने वजनाला हलके आणि आटोपशीर स्पीकर्स लाँच केले आहेत, जे घरगुती पार्टीज आणि आउटडोअर ट्रेक्ससाठी अगदी योग्य आहेत.

सिस्का BT4070X पॉवरफुल बेस वायरलेस स्पीकर्सद्वारे 4वॉट्सचे ताकदवान आउटपुट, 50 एमएमचे बेस ड्रायव्हर्स दिले जातात तसच त्यासोबत एक मायक्रो युएसबी केबलही दिली जाते. सिस्का मोबाइल अक्सेसरीजद्वारे ब्लुटुथ इयरफोन्स, पॉवर बँक्स, वायरलेस हेडसेट्स, कार चार्जर्स आणि अशा बऱ्याच उच्च दर्जाच्या उत्पादनांची श्रेणी उपलब्ध केली जाते.

उद्योगक्षेत्रातील अहवालानुसार भारतीय वायरलेस स्पीकर्सची बाजारपेठ 2020- 2025 दरम्यान 10 टक्के सीएजीआरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. स्मार्टफोन्सचा वाढता वापर, कमी दरांत उपलब्ध होणारे इंटरनेट, पोर्टटेबिलीटी आणि लवचिकता यांसाठी असलेली वाढती मागणी, वेगवान तंत्रज्ञान विकास आणि अवलंब इत्यादी घटक या बाजारपेठेच्या विकासात महत्त्वाचे ठरत आहेत.

नव्या वायरलेस स्पीकर्सच्या लाँचविषयी सिस्का समूहाच्या कार्यकारी संचालक श्रीमती ज्योत्सना उत्तमचंदानी म्हणाल्या, ‘सिस्कामधे आम्ही ग्राहकांना नवी आणि नाविन्यपूर्ण तसेच वापरण्यास सोपी व उच्च दर्जाची उत्पादने पुरवण्यासाठी बांधील आहोत. आमचे अद्यावत उत्पादन – सिस्का BT4070X वायरलेस स्पीकर्स या दोन्ही गोष्टी देणारे तसेच भारतीय बनावटीचे असल्यामुळे सरकारच्या आत्मनिर्भर भारत मिशनशी सुसंगत आहे. वायरलेस तंत्रज्ञान हे आपले भविष्य असल्यावर आमचा विश्वास असून अशाप्रकारच्या उत्पादनांना ग्राहकांकडून मिळणारी वाढती मागणी लक्षात घेता आम्ही ग्राहकांना सिस्का BT4070X वायरलेस स्पीकर्सच्या माध्यमातून पैशांचे पूर्ण मूल्य आणि सोयीस्करपणा देणार आहोत.’

सिस्का BT4070X पॉवरफुल बेस वायरलेस स्पीकर्सची महत्त्वाची वैशिष्ट्ये –

·         बीआयएस प्रमाणित  सिस्का वायरलेस स्पीकर्स बीआयएस प्रमाणित असून त्यामधे डीसी पोर्ट चार्ज करण्यासाठी मायक्रो युएसबी केबल दिली जाते.

·         सक्रिय वेळ आणि आउटपुट – सिस्का BT4070X द्वारे 4 वॅट्सचे पॉवर आउटपुट आणि 50 एमएमचा बेस ड्रायव्हर साइज दिला जातो. त्याशिवाय यामधील पॅसिव्ह रेडिएर उच्च दर्जाचे बुस्ट देते. स्पीकर्सचा सक्रिय वेळ 4 तासांपर्यंतचा असून कोणत्याही व्यत्ययाशिवाय तुम्हाला तुम्या आवडीचे संगीत ऐकता येते.

·         वजनास हलका आणि पोर्टेबल – या स्पीकर्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, तो वजनास हलका व आकाराने आटोपशीर असून सहजपणे बॅगमधे ठेवून कुठेही नेता येतो.

·         एचडी बेस साउंड – स्पीकर्सद्वारे एचडी बेस ध्वनी दिला जात असल्यामुळे संगीत जास्त स्पष्टपणे ऐकता येते व पर्यायाने याच्या बुस्टिंग तंत्रज्ञानासह संगीत ऐकण्याचा अनुभव आणखी दर्जेदार होतो. याची फ्रीक्वेन्सी श्रेणी 60Hz ते 20KHz आहे.

·         विविध बटन्स – BT4070X वेगवेगळी बटन्स देण्यात आली आहेत, उदा. गाणे बदलण्यासाठी शॉर्ट प्रेस, आवाज, प्ले किंवा पॉज अथवा फोन करण्यासाठी, पॉवर ऑन/ऑफ आणि एलईडी इंडिकेटरसाठी लाँग प्रेस.

·         इनपुट्स – या स्पीकरमधे 4 पोर्ट्स – 1 ऑक्झिलर वायरसाठी 3.5 एमएम ऑडिओ जॅकसह, टीएफ कार्ड स्लॉट (मायक्रो एसडी कार्डसह), युएसबी – ए स्लॉट आणि मायक्रो युएसबी स्लॉटसह देण्यात आले आहेत.

·         मेड इन इंडिया – सिस्का BT4070X पॉवरफुल बेस वायरलेस स्पीकर्सचे उत्पादन भारतात करण्यात आले आहे.

·         सोपी कम्पॅटिबिलीटी – सिस्का स्पीकर्स खऱ्या अर्थाने वायरलेस असून ब्लुटुथ तंत्रज्ञानाचा वार करून सहजपणे तुमच्या स्मार्टफोनशी जोडले जाऊ शकतात.

सिस्का BT4070X वायरलेस स्पीकर्सची किंमत 1499 रुपये असून ते आघाडीच्या रिटेल दालनांतून खरेदी करता येतील. या उत्पादनावर 12 महिन्यांची वॉरंटी देण्यात आली असून ते काळा, निळा व करड्या रंगांत उपलब्ध आहे.

सिस्का अक्सेसरीजविषयी

आजचे जग कनेक्टेड आहे आणि उपकरणे प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाली आहेत. सिस्का अक्सेसरीजतर्फे अत्याधुनिक आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आलेली अक्सेसरीजची श्रेणी तुमचा अनुभव समृद्ध करणारी आहेत. वायरलेस स्पीकर्सपासून हेडसेट्सआणि इयरफोन्सपर्यंत, पॉवर बँक्सपासून ट्रॅव्हल आणि कार चार्जर्स, चार्जिंग आणि सिंक केबल्सपर्यंत सिस्का अक्सेसरीजतर्फे केवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचीनाविन्यपूर्ण व वापरण्यास सोपी उत्पादने उपलब्ध करून दिली जातात. सिस्का अक्सेसरीजची उत्पादने उच्च दर्जाची आणि वाजवी किंमतीत उपलब्ध असतात. जास्तीत जास्त ग्राहकांना सेवा देण्यासाठी सिस्का अक्सेसरीज आघाडीची दालने तसेच ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...