प्राध्यापक द मा मिरासदार सरांचं निधन वृत्त मनाला चटका लाउन जाणारं आहे.
गरवारे कॉमर्स कॉलेजमध्ये असताना पीडी,एफवाय मध्ये सर आम्हाला शिकवायला होते. त्यांच्या वर्गात बसणं हे आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाचं असायचे, इतर प्राध्यापकांच्या तासाला आम्ही फारसे कधी बसत नव्हतो पण सरांचा तास आम्ही कधी चुकवत नव्हतो. प्रथम वर्षाला महाविद्यालय प्रवेश देताना तत्कालीन प्राचार्य डी सी गोखले सरांनी आम्हाला नकार दिला होता पीडी मध्ये तुम्हाला शिकवणाऱ्या प्राध्यापकांचे ना हरकत पत्र आणा अशी अट त्यांनी घातली होती, अनेक प्राध्यापकांनी एनओ सी द्यायला नकार दिला पण मिरासदार सरांनी ताबडतोब आम्हाला प्रवेश द्या असं लिहून दिलं आणि उलट असे म्हणाले माझ्या वर्गात तुम्ही नेहमी शांत असता, सरांच्या वर्गात शांत असण्याचं कारण म्हणजे सरांची प्रसन्न मूर्ती, ते शिकवत असताना अतिशय मन रमून जायचं.
गेली काही वर्षे ते आजारी होते पण त्यापूर्वी आम्ही आमचा मित्र आनंत वाघ यांच्या पुढाकाराने कॉलेजमधील काही मित्र मैत्रिणीनी एकत्र येऊन मी महापौर झाल्यावर सरांच्या हस्ते माझा सत्कार केला तो माझ्या कायम स्मरणात राहील.
अनंत वाघ ह्याच्या पुढाकाराने सरांना आम्ही काही मित्रा बरोबर स्नेहभोजन करीत असु त्यानंतर सरांचा गप्पांचा फड रंगत असे, आता ते होणे नाही. सरांना माझी आदरपूर्वक श्रद्धांजली🙏
अंकुश काकडे .
माजी विद्यार्थी व
माजी महापौर पुणे
सरांचं निधन मनाला चटका लाउन जाणारं -अंकुश काकडे
Date:

